*संघर्षमय प्रवास*

0
442

सातारा पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संपकाळ फिंगरप्रिंट परीक्षेत देशात आल्या पहिल्या….

संघर्षमय प्रवास..

कष्ट करायची तयारी असेल, तर यश आपल्या पायावर लोळण घालतं. अडचणींवर मात करत स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो. वडिलांच्या निधनानंतर मुलीच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र झटणाऱ्य़ा आईसाठी मुलीने यश मिळवलं असेल तर, त्याचे मोल अनमोल असते. प्रियांका संकपाळ हिच्या बाबतीत पण असेच एक उदाहरण आहे. वडील लहानपणीच वारले. तिच्या आज्जीने व आईने घराची जबाबदारी उचलंत मुलीचे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षणासाठी कधीच कोणाकडे हात पसरले नाहीत.

‘मुलगी शिकली…प्रगती झाली हे बोधवाक्य प्रचलित आहे. मुलगा शिकला, तर एकच घर उजळते. मात्र, मुलगी शिकली तर दोन घरे उजळतात. अशीच एक कहाणी आहे पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ यांची

अतिशय सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रियांका यांचा जन्म वडील श्री.मारुती रामचंद्र संकपाळ आई सौ. दुर्गा संकपाळ या दाम्पत्याच्या पोटी शिरोली पुलाची ,तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे झाला..आई वडीलांनी काबाडकष्ट करून प्रियांकाला मोठे करून चांगले शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प केला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते प्रियांका अडीच वर्षांची असताना वडीलांचे अकाली निधन झाले खेळण्या बागडण्याच्या वयात वडीलांचे झालेले निधन हे दुःख सहज विसरण्यासारखे नव्हते…
जन्म आणि मृत्यू बाबत कुठलाही लवलेश नसलेली निरागस प्रियांका पुन्हा – पुन्हा आईला आपल्या वडिलांबद्दल विचारत होती. मुलीचा व भविष्याचा विचार करून आई पण आणखीच जास्त चिंतेत राहत होती.. पण या प्रसंगाने प्रियांकाने आपले ध्येय विसरले नाही वडिलांचे छत्र हरविल्याने घरचा आर्थिक कारभार बिघडला. त्यांच्या डोक्‍यावर कायम असलेला वडिलांचा आशीर्वादाचा हात निर्जीव झाला. पण आज्जीने व आईने त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही.

या सगळ्या यशात माझी आजी प्रेरणास्थान आहे हे नेहमी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका संकपाळ सांगतात…

लहानपणी प्रत्येकाच्या कुटुंबात एकतरी व्यक्ती अशी असते जी आपला खूप लाड पुरवत असते. आमच्या कुटुंबातील ती व्यक्ती म्हणजे माझी आजी
माझ्यावरती आई सारखे प्रेम करणारी दुसरी व्यक्ति ती म्हणजे माझी आजी लहानापासून मोठे झाले तरी काळजी करते….

एवढे मोठे दुःख सहन करत प्रियांकाने प्राथमिक शिक्षण कौतुक विद्यालय शिरोली पुलाची येथे सुरू केले… लहानपणापासून प्रियंका शाळेत हुशार होती शिक्षणा शिवाय आपण पूढे जाणार नाही हे चांगले समजले होते …दिवस सरत गेले आणि प्रियांकाने प्राथमिक शिक्षण यशस्वी पणे पुर्ण केले.. या नंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी -डॉ. डी वाय पाटील जुनियर कॉलेज कोल्हापूर (अकरावी व बारावी)येथे दाखल झाल्या या नंतर त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर मधून (फर्स्ट इयर सेकंड इयर BSc) पूढे विवेकानंद कॉलेज -(BSc. Statistics) छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (बॅचलर इन जर्नालिझम ॲण्ड मास कमुनिकेशन ) कौटुंबिक व आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रियांका यांना कला, साहित्य, क्रीडा सर्वच क्षेत्रांत चमक दिसून येत होती.. पोलीस दलात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फिंगरप्रिंट PSI(finger print) परीक्षेमध्ये महाराष्ट्रात ओपन मुलींमध्ये 2018 साली प्रथम.
त्यानंतर पहिली पोस्टिंग- सातारा फिंगर प्रिंट विभाग 21 नोव्हेंबर 2019 ते आज अखेर …

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री.अजय कुमार बन्सल यांनी केले कौतुक..

सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत प्रथम. देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

फिंगरप्रिंट एक्सपर्ट या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण 76 फिंगरप्रिंट चे अधिकारी उपस्थित होते ही परीक्षा लेखी प्रात्यक्षिक व मुलाखत अशा स्वरुपात घेण्यात आली होती सदर परीक्षेस फिंगरप्रिंट विभाग सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांंना 250 पैकी 224 मार्क मिळवून देशात प्रथम आल्या आहेत व देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत…

अशा या जिगरबाज धाडसी अभ्यासू महिला पोलीस अधिकार्यांला पूढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा

संकलन-.उदय आठल्ये
पोलीस मित्र सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here