26.2 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home ठळक बातम्या *पुलाच्या कामाबाबत तक्रार*

*पुलाच्या कामाबाबत तक्रार*

0
393

राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा पाटी येथील ग्रामस्थांनी रोखले पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम…

पुलाचे काम उत्कृृष्ट दर्जाचे करण्याची मागणी..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } या मार्गावरील मसलगा पाटीवर विविध कामे केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.कामासाठी गुत्तेदार स्वत:शनिवारी सकाळी पुलावरील डांबरीकरणाचे काम सुरू केले.माञ,पुलासाठी वापरण्यात आलेले जुने पाईप काढण्यात यावे,त्यानंतरच डांबरीकरण करावे,अशी मागणी छावा संघटना आणि ग्रामस्थांनी केली.त्यामुळे डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } या महामार्गावरून मसलगा गावात जाणार्‍या रस्त्यावरती पुल असून,पुल बांधकामासाठी जुनेच पाईप वापरण्यात आलेले आहेत.यामुळे हे पाणी या पाईपमधून जात नसल्याने शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी थांबून शेतीचे मोठे नुकसान होत आहे.तसेच,मसलगा पाटीवरती बस थांबा येथे दिशादर्शक फलकाचेही काम बाकी राहिले आहे.
माञ,पुलाखालील जुने पाईप काढूनचं काम करावे,असा पविञा छावा संघटना आणि ग्रामस्थांनी घेतल्याने काम थांबविण्यात आले.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
———————————————————————
विवाह-सोहळ्यासाठी मसलगा गाठणे होते…माञ,वर्‍हाडी गेले निटूरला असे का..!

दि.19 डिसेंबर रोजी मसलगा येथील एका कन्येचा विवाह सोहळा पार पडला.लग्नाची घटीका जवळ आली असताना वर्‍हाडी मंडळीही वेळेवर निघाली होती.परंतु,मसलगा पाटीवरती दिशादर्शक फलकच नसल्याने मसलगा येथे लग्नासाठी जावक वर्‍हाडी चक्क निटूरचं गाठले.मसलगा मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा वर्‍हाड्यांनी मसलगा गाठले.यामध्ये पाटीवरती गावच्या नावाचा फलकच नसल्याने रस्ता चुकल्याची चर्चा लग्नसोहळ्यात रंगत होती.
———————————————————————
राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावाचा उल्लेखही चुकीचा आहे त्यात इंग्रजी मिस्टेक जास्त प्रमाणात आणि मराठीचा अभाव असल्याचे जाणवत आहे.याकडे संबंधितांनी लक्ष देऊन दुरूस्त करणे आवश्यक आहे.
———————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]