28.7 C
Pune
Monday, June 9, 2025
Homeमनोरंजन*'सर्किट' चित्रपटाला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद*

*’सर्किट’ चित्रपटाला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद*

मुंबई – मधूर भांडारकर व पराग मेहता निर्मित ‘ सर्किट ‘ हा चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफुल झाले असल्याचेही वृत्त आहे.
अत्यंत उत्कंठावर्धक असलेला ‘सर्किट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून पहिल्याच दिवशी या चित्रपटावर सिने रसिकांनी उड्या टाकल्या . अनेक ठिकाणचे शो हाऊसफुल झाले होते . चित्रपटातला लातूरचा सुपुत्र अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिले असून ‘काहीसा बावरतो .. ‘ व ”वाजवायची सनकन… ‘ ही गाणी खूपच हीट ठरत आहेत.

   भालजी पेंढारकर यांचे पणतू आकाश पेंढारकर दिग्दर्शित या चित्रपटाला अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिलेले आहे. तसेच वैभव तत्ववादी ,ऋता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्या  या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत .महेश मांजरेकर दिग्दर्शित ' कुटुंब' , अंकुश चौधरी निर्मित 'झकास' , आदींसह 'टार्गेट ' , 'मॅटर ' , 'डिस्को सन्या'  यासह अनेक चित्रपटांना अभिजीत कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलेले आहे . 'सर्किट ' या चित्रपटात सोनू निगम ,-अवधूत गुप्ते , बेला शेंडे या आघाडीच्यागायक,  गायीकांनी गाणी गायलेली आहेत .  सोनू निगम यांनी गायलेले   'काहीसा बावरतो … ' व अवधूत गुप्ते यांनी ' वाजवायची सनकन... ' ही गाणी गायली आहेत.

निमंत्रीसाठी मुंबईमध्ये खास ‘सर्किट’ चित्रपटाचे प्रदर्शन

बहुचर्चित ‘सर्किट’ या मराठी चित्रपटाचे खास निमंत्रीसाठी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
स्वर्गीय भालजी पेंढारकर यांचे पणतू आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ हा चित्रपट अनेकांनी पाहून समाधान व्यक्त केले .लातूरचा सुपुत्र व सुप्रसिद्ध संगीतकार अभिजीत कवठाळकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे. अनेकांनी या चित्रपटाचे संगीत पाहून अभिजीत कवठाळकर यांचे अभिनंदन केले. या चित्रपटांमध्ये अविट अशी गाणी आहेत .
अंधेरी येथील रेड बल्ब या स्टुडिओमध्ये खास निमंत्रणासाठी शोचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केलेले वैभव तत्त्ववादी, ऋता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्यासह या चित्रपटाला संगीत दिलेले अभिजीत कवठाळकर, जयंत वाडकर, मिलिंद शिंदे, पुणे व मुंबई येथील अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]