Homeराष्ट्रीय*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत*

नवी दिल्ली, 8 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.

मुख्यमंत्री श्री शिंदे आज पासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज सायंकाळी त्यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, उत्तर प्रदेश वासियांनी श्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री तसेच आमदार या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या येथे ‘प्रभू श्री रामचंद्र’ यांचे दर्शन घेतील.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments