26.9 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home ठळक बातम्या स्वतंत्र शासकीय निवासी शाळा

स्वतंत्र शासकीय निवासी शाळा

0
392

 

देवणी तालुक्यासाठी मुलांची स्वतंत्र शासकीय निवासी शाळा उभारली जाणार

आ. निलंगेकरांच्या मागणीने जमीन उपलब्ध तर निधीचीही होणार तरतूद

निलंगा/प्रतिनिधी ः- प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणे आवश्यक आहेच. किंबहूना तो त्याचा हक्क आहे आणि हक्क मिळवून देण्यासाठी निलंगा मतदारसंघाअंतर्गत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून शासकीय निवासी शाळा उभारल्या जात आहेत. मतदारसंघाअंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यात मुलांची स्वतंत्र शासकीय निवासी शाळा उभारली जावी याकरीता जिल्हाधिकार्‍यांकडे जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली होती. ही मागणी मंजूर झालेली असून धनेगाव येथे 1 हेक्टर 80 आर जमीन उपलब्ध झालेली असून या जागेवर शाळेची इमारत बांधण्याकरीता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच निधीची तरतुद होऊन शाळा इमारत बांधकामास सुरुवात होईल अशी माहिती आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली .

शिक्षण मिळविण्याचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकांना प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त हावे याकरीता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातूनच निलंगा मतदारसंघात सुद्धा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे याकरीता आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगानेच निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यासाठी मुलांची स्वतंत्र शासकीय निवासी शाळा उभारली जावी याकरीता आ. निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे जमीन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केलेली होती. सदर जमीन धनेगाव येथे असलेल्या शासकीय गायरान जमीनीतून देण्यात यावी असेही सुचविलेले होते. आ. निलंगेकर यांची ही मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी धनेगाव येथील 22 हेक्टर 10 आर असलेल्या गायरान जमीनीपैकी 1 हेक्टर 80 आर जमीन मुलांच्या शासकीय निवासी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढलेले आहेत.

देवणी तालुक्यासाठी स्वतंत्र मुलांची शासकीय निवासी शाळा उभारण्याकरीता जमीन उपलब्ध झालेली असून या जागेवर लवकरच इमारतीचे बांधकाम सुरु व्हावे याकरीता आ. निलंगेकर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी पत्राद्वारे केली असून याबाबत पाठपुरावाही सुरु करण्यात आलेला आहे. या पाठपुराव्याला लवकरच यश प्राप्त होऊन निधीची तरतुद होऊन इमारत बांधकामास सुरुवात होईल अशी माहिती आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]