सदिच्छा भेट
आपल्या सुमधुर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना नुकताच ‘महाराष्ट्रभूषण ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली.त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राच्या अनुषंगाने त्यांच्यासमवेत चर्चा केली.












