कोरोना जागर उपक्रम

0
234

कोरोनाविषयक अनुभव सांगण्याची

संधी देणारे खुले व्यासपीठ

 – सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानने ‘कोरोना जागर’ या उपक्रमांतर्गत दि. १३ जून, २०२१ पासून दि. १५ ऑगस्ट, २०२१ पर्यंत दर रविवारी संध्याकाळी ५ वाजता कोरोना अनुषंगिक शास्त्रीय व वैद्यकीय माहितीसंदर्भात लोकांना अवगत करण्यासाठी नि:शुल्क परिसंवादाचे आयोजन केले.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक व प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सनी साधनव्यक्ती म्हणून त्यात योगदान दिले. त्यांचे आभार.

या उपक्रमाचा उद्देश कोरोनासंबंधी शास्त्रीय माहिती देवून अनेक गैरसमज दूर करून जनजागृती करण्याचा तर होताच, मात्र त्याचबरोबर कोरोनासंबंधी वैद्यकीय व इतर समकक्ष क्षेत्रांच्या योगदानापासून त्यांच्या भूमिका, मर्यादा आणि विशेष म्हणजे विविध सेवांबद्दलची बांधिलकी – याबद्दलही अवगत करणे हा होता.

कोरोनासंबंधी वैद्यकीय पातळीवरची शास्त्रीय माहिती देणारी ही व्याख्याने आणि त्यानंतरच्या चर्चा सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानने आपल्या संकेतस्थळावरील दुव्यांच्या आधारे संकलित केल्या असून त्यांच्या चलचित्रांचे (व्हिडीओज) अवलोकन इच्छुकांना करता येईलच. त्यासाठी संकेतस्थळास भेट द्यावी लागेल. (https://www.skspratishthan.com)

‘कोरोना जागर’ या उपक्रमाचे वैद्यकीय व शास्त्रीय माहितीचे पहिले पर्व या दृष्टीने यशस्वीपणे संपन्न झाले.

दुसऱ्या पर्वात आपणा सर्वांसाठी खुले व्यासपीठ असेल. 

त्यामागेही समाजाने कोरोनासंबंधी शास्त्रीय माहिती घेवून आपापल्या पातळीवर आपले व हितसंबंधीयांचे किमान आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी जागरूक रहावे आणि विविध सेवांबद्दल विश्वासाचा दृष्टीकोन ठेवून सामाजिक आशावाद व सलोखा कायम रहावा, असाही हेतू आहे.

कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. समाज अनेक पातळ्यांवर ढवळून निघाला. मात्र, हेही एक वास्तव आपण अनुभवले आहे कि, शेवटी संकटकाळातही अनेकांचे हात, साथ, आणि अनेकांचे अनेक प्रकारचे सहकार्य मिळाल्यामुळेच अनेकांना त्यापासून आपला बचावही करता आला.

अजूनही कोरोनाने आपली पाठ पुरती सोडलेली नाही आणि धोका निश्चित आहेच, अशावेळी उमेद, आशावाद, विश्वास आणि आत्मविश्वास राखून, संयमाने त्याचा सामना करता यावा यासाठी सर्वसामान्य माणसासमोर ज्ञान आणि भान ठेवता यावे, लोकांना मनातले थेट बोलता यावे, यासाठी दुसऱ्या पर्वाच्या खुल्या व्यासपीठाचे प्रयोजन आहे. हा सर्वसामान्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी, समाज एकवटण्याचा प्रयत्न आहे.

त्यात –

१. कोरोनामुक्त (कोरोनासंसर्गातून मुक्त / बरे) झालेल्या व्यक्ती –

२. कोरोनाकाळात विविध प्रशासकीय कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी

३. सामाजिक व स्वयंसेवी कार्य करणाऱ्या व्यक्ती –

यांचे अनुभवकथन ऑनलाईन आयोजित केले जाणार आहे.

याबाबतीत असे वैचारिक योगदान देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, अनुभवकथन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी –

१. वरील संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फेसबुक अथवा whatsapp दुव्यांचा वापर करून किंवा
२. skspratishthan@gmail.com या इमेल पत्त्यावर – किंवा
३. ७५८८०६२५४६ या भ्रमणध्वनीवर

आपले नाव, ठिकाण व भ्रमणध्वनी कळवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कृपया, प्रतिसाद द्या. आपले अनुभवकथन अनेकांना उपयुक्त ठरू शकते.

याबाबतीत असे वैचारिक योगदान देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, अनुभवकथन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी –

. वरील संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फेसबुक अथवा whatsapp दुव्यांचा वापर करून किंवा

. skspratishthan@gmail.com या इमेल पत्त्यावर – किंवा

. ७५८८०६२५४६ या भ्रमणध्वनीवर

आपले नाव, ठिकाण व भ्रमणध्वनी कळवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कृपया, प्रतिसाद द्या. आपले अनुभवकथन अनेकांना उपयुक्त ठरू शकते.

डॉ. संतोष कुलकर्णी

सेक्रेटरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here