५३ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात प्रथम क्रमांक

0
90

नागपूर : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या वतीने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२४–२५ हे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या राज्यस्तरीय प्रदर्शनात शिक्षक विकास पुंडलिक सरकाळे क्रांती देवी सावित्रीबाई फुले विद्यालय ननंद तालुका निलंगा यांनी आपल्या नाविन्यपूर्ण व उपयुक्त शैक्षणिक साधने मोबाईल ॲप आणि थ्रीडी बुक या शैक्षणिक प्रथम क्रमांक मिळाला व त्याचे विभागीय साठी निवड झाली प्रकल्पाची संकल्पना, वैज्ञानिक मांडणी, उपयुक्तता व सादरीकरण या निकषांवर तज्ज्ञ परीक्षक समितीने विकास सरकाळे याची निवड केली. या उल्लेखनीय यशामुळे लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे.या यशाबद्दल विकास पुंडलिक सरकाळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून शाळा प्रशासन, पालक व शिक्षण विभागाकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here