माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांना ८१ व्या जयंतीनिमित्त विलासबागेत जनसमुदायाचे भावपूर्ण अभिवादन
‘भावस्वरांजली’च्या स्वराभिषेकाने बाभळगाव येथे आदरांजली सभा संपन्न; हजारो स्नेही व कार्यकर्त्यांची उपस्थिती
लातूर (प्रतिनिधी): मंगळवार, दि. २६ मे २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकाभिमुख नेतृत्व, ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडून जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची आज मंगळवार, दि. २६ मे रोजी ८१ वी जयंती अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

राजकारण, प्रशासन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल साधत प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतीस्थळी कुटुंबीय, नातेवाईक आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो स्नेही मंडळींच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.सोमवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे ‘भावस्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली.

प्रारंभी, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा देशमुख, विनायकराव पाटील, उल्हासदादा पवार, जयसिंह देशमुख, अभिजीत देशमुख आणि डॉ. सारिका देशमुख, चि. वंश, कु. दिवीयाना, यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ शिष्य सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे व त्यांचे सहकारी यांनी शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ‘भावस्वरांजली’ सादर केली, यातून आदरांजली सभेला भावपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांच्यासह लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेहमंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, आबासाहेब पाटील, ॲड. व्यंकट बेद्रे, जगदीश बावणे, अभय साळुंके, व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्ही. पी. पाटील, दिलीप पाटील नागराळकर, ललीतभाई शहा, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवाजी जवळगेकर, ॲड. किरण जाधव, चेअरमन अनंतराव देशमुख, व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, व्हा. चेअरमन अशोक काळे, व्हा. चेअरमन प्रविण पाटील, व्हा. चेअरमन विजय देशमुख, ॲड. दिपक सुळ, बी.व्ही.मोतीपवळे, दिलीप माने, डॉ. हणमंत किणीकर, डॉ.बी.आर.पाटील, यशवंत पाटील, सर्जेराव मोरे, रविंद्र काळे, गोविंद बोराडे, सुनील पडीले, कार्यकारी संचालक कल्याण पाटील, कार्यकारी संचालक आत्माराम पवार, एस.डी.बोखारे, आर.बी.माने, जितेद्र देहाडे, डॉ. लक्ष्मण देशमुख, प्राचार्य बाबासाहेब गोरे, प्राचार्य अजय पाटील, गणपतराव बाजूळगे, संतोष सोमवंशी, रवीद्र काळे, ॲड. समद पटेल, संतोष देशमुख, सचिन बडापल्ले, संचालक कैलास पाटील, मदन भिसे, बंकट भिसे, रणजीत पाटील, अमृत जाधव, सुभाष माने, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, व्यंकटेश पुरी, अनिल पाटील, सतिश पाटील, व्ही.के.आचार्य, दगडूअप्पा मिटकरी, विदया पाटील, सुनीता आरळीकर, सपना किसवे, स्वंयप्रभा पाटील, प्रिती भोसले, स्वाती पवार, संगीता मोळवणे, मीना सुर्यवंशी, केशरबाई महापूरे, खाजबानू बुऱ्हाण अन्सारी, उषा चव्हाण, उपसरपंच गोविंद देशमुख, लक्ष्मी भोसले, दगडूसाहेब पडिले, रामानुज रांदड, प्रा. गोविंद घार, श्याम भोसले, प्रा. डी. एन. केंद्रे, प्रकाश कासट, कृष्णकुमार बागड, प्रविण सुर्यवंशी, सुर्यकांत कातळे, प्रविण कांबळे, पाडुरंग वीर, जितेंद्र स्वामी, डॉ. बालाजी साळुंके, बालाजी वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, गुरुनाथ गवळी, लक्ष्मण मोरे, जयचंद भिसे, फैसल कायमखानी, श्रीनीवास शेळके, संभाजी रेड्डी, चंद्रकांत चिकटे, धिरज पाटील, प्रशांत पाटील, बबन देशमुख, ॲड. देवीदास बोरुळे पाटील, तुकाराम आडे, राजकुमार जाधव, पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, बसवंतआप्पा बरडे, डॉ. एस.एन. जटाळ, इसरार सगरे, अमर मोरे, दिपक पटाडे, राजेद्र मस्के, निलेश फेरे, अतिश चिकटे, विकास कांबळे, गिरीष ब्याळे, विष्णू धायगुडे, अभिषेक पतंगे, नारायण ढोरमारे, गोटू यादव, संजय निलेगावकर, सोनू डगवाले, रमेशसिंह बिसेन, डॉ. अरविंद भाताब्रे, राजकूमार पाटील, राजेद्र काळे, कलीम तांबोळी, युवराज जाधव, बसवराज धरणे, सुरेश धानुरे, अमित पांडे, प्रदिप गगणे, बादल शेख, फारुख शेख, भैरवनाथ सूर्यवंशी, उमाकांत जाधव, सतिश हलवाइ, लक्ष्मीकांत मंठाळे, संजय पाटील खंडापूरकर, ॲड. विजय गायकवाड, सुनील बसपूरे, विकास वाघमारे, जयदेव मोहीते, श्रीशैल गडगडे, राम स्वामी, डॉ.दिनेश नवगिरे, पुनीत पाटील, बालाजी वाघमारे, मारुती पांडे, सुपर्ण जगताप, नंदकिशोर पापा मोदी, पवन देशमुख, धोंडीराम यादव, मुक्ताराम पिटले, गोविंद देशमुख, विजयकुमार साबदे, रामदास पवार, एकनाथ पाटील, गोविंद केंद्रे, विजयकुमार धुमाळ, माधव गंभीरे, आनंद वैरागे, पवन गायकवाड, चक्रधर शेळके, अभिजीत इगे, गणेश देशमुख, नरसिंह बुलबुले, मनोज पाटील, बळवंत पाटील, प्रदिप राठोड, ॲड. शरद देशमुख, तात्यासाहेब देशमुख, निखील पाटील, जयदेव बर्वे, महादेव मुळे, बालाजी पाराशर, सचिन सुर्यवंशी, लिंबराज पवार, सहदेव मस्के, अविनाश देशमुख, गोरोबा लोखंडे, हमीद शेख, अशोक पाटील, हणमंत पवार, अशोक देडे, शिवाजी कांबळे, रमेश देशमुख, नाना जाधव, वाल्मीक माडे, संजय बिराजदार, किरण बनसोडे, अविनाश बटटेवार, श्रीकांत बैले, सुमीत खंडागळे, विनोद वाकडे, सतीश हलवाई, पत्रकार जयप्रकाश दगडे, राम जेवरे, हरी तुगावकर, राजू पाटील, अरूण समुद्रे, शहाजी पवार, दिपरत्न निलंगेकर, एजाज शेख, संजय सगरे, विनोद चव्हाण, यशवंत पवार, हरीराम कुलकर्णी, संजय पाटील, आनंद दणके, रवीकिरण सुर्यवंशी, अंकलकोटे, श्रीकांत पाटील, संतोष बिराजदार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या. या सभेचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले.

————-




