हासुरी (बु) परिसरातील तरुणांचा भाजपात प्रवेश...
निलंगा, -( प्रशांत साळुंके)- औसा विधानसभा मतदारसंघातील हासुरी (बु) ता.निलंगा परिसरातील तरुणांनी दि.३ जानेवारी रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत औसा येथील संपर्क कार्यालयात भाजप पक्षात प्रवेश केला.
सुधीर राजेंद्र डांंगे,सुनील बाबुराव मुडे हत्तरगा हालसी, अमिर गुलाब शेख, सोपान अंगद वाडीकर, राहूल गुंडू काळे, सचिन बाबुराव अरिकर, मुकेश दामाजी भाले यांच्यासह अनेक तरुणांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश देण्यात आला.याप्रसंगी भाजपचे अॅड. अरविंद कुलकर्णी, औसा नगरपरिषदेचे गटनेते सुनील उटगे, औसा भाजपचे शहराध्यक्ष लहू कांबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमाशंकर राचट्टे,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे,भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष लाला शेख,कासारसिरसी मंडळ महिला अध्यक्षा कल्पना ढविले, प्रा.शिव मुरगे,कासारसिरसी शहराध्यक्ष गोरख होळकुंदे,कासारसिरसी मंडळ सरचिटणीस धनराज होळकुंदे, दिपक ढविले आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…












