34.7 C
Pune
Wednesday, March 25, 2026
Homeठळक बातम्या*आमदार निलंगेकर यांचे साकडे*

*आमदार निलंगेकर यांचे साकडे*

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी खरोसा येथील प्रसिध्द जागृृत देवस्थान श्री रेणुका मातेच्या चरणी

लोकप्रिय आ.निलंगेकर यांनी आरती करून साकडे घातले…

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- विरोधकांनो गाड्यांचा ताफा अडवून असली भ्याड कृत्ये करण्यापेक्षा पंतप्रधान मोदीं च्या जनसेवा व विकास कार्याशी सकारात्मक स्पर्धा करून दाखवा असे स्पष्ट मत माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले नुकताच पंजाब मध्ये पंतप्रधानाचा ताफा अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता त्यामुळे त्यांना दिर्घायु लाभावे यासाठी निलंगेकर हे कार्यकर्त्यासह खरोसा येथील जागृत देवस्थान असलेल्या रेणूका मातेला साकडे घालण्यासाठी गेले होते.


याप्रसंगी, त्यांच्या समवेत संघटन सरचिटणीस संजय दोरवे ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे प्रदेश प्रवक्ते प्रेरणाताई होनराव, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन.दगडू सोळुंके, भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, शहराध्यक्ष अँड. वीरभद्र स्वामी, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस तानाजी बिराजदार, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सभापती, सदस्य, युवा मोर्चा अध्यक्ष , निलंगा नगरपालिका नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी च्या पंजाब दौऱ्या दरम्यान ताफा अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता या घटनेवरून देशभरामध्ये सध्या धुमाकूळ सुरू आहे त्यामुळे याचाच भाग म्हणून देशभरात भाजपा अध्यात्म आघाडी च्या वतीने व भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून सर्वत्र होम हवण होत असून देवाला प्रार्थना करण्यात येत आहेत .


दरम्यान, माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यासह खरोसा येथील प्रसिध्द जागृृत देवस्थान श्री रेणूका मातेला आरती करून पंतप्रधानाला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]