स्व.डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्ताने अक्का फाॅउंडेशनच्या वतीने एसटी कामगारांना अन्नधान्याचे किट वाटप….
प्रदेश सचिव तथा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते केले वाटप..
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
गेल्या चार महिन्यापासून निलंगा आगाराचे एसटी कामगार विलनीकरणाचा लढा लढत आहेत,त्यांचे आंदोलन अविरत चालू आहे परंतु महाविकास आघाडी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही.निलंगा आगारातील ३६५ कर्मचारी विलनीकरण व विविध मागण्या मान्य करण्यासाठी लढत आहे.राज्यात आतापर्यंत ८१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.तरीदेखील हे असंविधनशील सरकार त्याना वा-यावर सोडून सदरील कर्मचाऱ्यांचे विलनीकरण करत नाही त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.याची दखल घेत महाराष्ट्र राज्य भाजपा सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी स्व.डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती निमित्त अक्का फाँडेशनच्या वतीने ३६५ एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहे.

यावेळी बाळासाहेब शिंगाडे,शेषराव ममाळे,मनोज कोळ्ळे,माधव फट्टे,श्रीमंत जाधव,तम्मा माडिबोने,सुमीत इनानी,वैभव पाटील,शरद पेठकर,पिंटू पांचाळ.उपस्थित होते.




