मुंबई, दि. 18 : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.
मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य
यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
अटी व शर्ती
हे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू आहेत- दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे. ०००००
अत्यंत सुदृढावस्थेत जन्मलेली एक बालिका अचानक ताप येण्याचे निमित्त होऊन वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच विकलांग, इंद्रियशिथिल बनते… आणि आई-बापाचा तिला पूर्ववत करण्याचा संघर्ष सुरू होतो… हे मूल आता बरे होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती एक दिवस सामोरी येते… त्या वस्तुस्थितीसह ते तिला जीवापाड सांभाळतात… आपल्या माघारी तिच्या आयुष्याची तरतूद म्हणून पै न पै जोडून ३५ लाख रुपयांची बचत करतात… मात्र, वयाच्या ४५व्या वर्षी ती मुलगी अखेरचा श्वास घेते… तिच्या जाण्याने कोलमडून पडलेले हे दांपत्य त्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा एक अतिशय मोठा निर्णय घेते… आणि त्या मुलीचेच असणारे ३५ लाख रुपये तिच्याच स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाला प्रदान करतात… आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा हृद्य सोहळा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडून आला… या निधीमधून आता विद्यापीठात संशोधक विद्यार्थिनींसाठीचे वसतीगृह साकारले जाणार आहे… कोल्हापूर येथील पंडित सदाशिव मारुलकर आणि सौ. रजनी पंडित मारुलकर हे या ज्येष्ठ दांपत्याचे नाव आणि अस्मिता पंडित मारुलकर ही त्यांची दिवंगत कन्या! श्री. मारूलकर हे १९६८ ते १९९९ या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठात कार्यरत होते. सहाय्यक कुलसचिव पदावरून ते निवृत्त झाले. त्यांची कन्या अस्मिता तीन वर्षांची असताना तापाचे निमित्त होऊन अंथरूणाला खिळली. तिच्या शरीराचे नियंत्रण करणारे मेंदूतील केंद्र निकामी झाले. केवळ दृष्टी, श्रवण आणि बुद्धीमत्ता एवढेच कायम राहिले. १९ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ४५व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. आपल्या माघारी तिची हेळसांड होऊ नये, यासाठी या दांपत्याने पै न पै साठवून ३५ लाख रुपयांची बचत केली. मात्र, आता मुलगीच न राहिल्याने तिचाच अधिकार असलेल्या रकमेचा विनियोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करण्याचा निर्णय मारुलकर दांपत्यानं घेतला. सौ. रजनी आणि पंडित मारूलकर या दांपत्यानं अस्मिता हिच्या स्मृती शिवाजी विद्यापीठामध्ये कायमस्वरुपी जतन केल्या जाव्यात, यासाठी तिच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास ३५ लाख रुपये इतकी रक्कम विनाअट देणगीरूपाने स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदान केली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यापीठाच्या वतीने या निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मारुलकर कुटुंबियांनी ज्या भावनेतून हा निधी विद्यापीठास प्रदान केला, तिचा आदर राखून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनींसाठी प्रस्तावित असलेल्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी या निधीचा विनियोग करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणं वसतीगृहाच्या प्रथम मजल्यावर ‘सौ रजनी पंडीत मारूलकर आणि पंडीत मारूलकर यांनी कन्या अस्मिता हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून या मजल्याचे बांधकाम झाले’ अशी कोनशिला दर्शनी भागात बसविण्यात येईल, असंही सांगितलं. मारुलकर दांपत्यानं या देणगीद्वारे दातृत्वाचे एक महान उदाहरण जगासमोर ठेवले आहे, असे गौरवोद्गारही कुलगुरूंनी काढले. मारुलकर दांपत्यास विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली द्विखंडीय ‘तुकारामबोवांची गाथा’ प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी मारुलकर यांनी, हा निधी अस्मिताचा आहे. तो केवळ तिच्या वतीने आम्ही विद्यापीठास सुपूर्द करीत आहोत. त्याचा विद्यापीठाने योग्य कारणास्तव विनियोग करावा, अशी निरलस अपेक्षा व्यक्त केली. काल स्वातंत्र्यदिनानिमित्त या एका आगळ्या आणि हृद्य कार्यक्रमाचा साक्षीदार होता आलं… त्यातून दातृत्वाचं तेज किती प्रखर असू शकतं आणि एखाद्या संस्थेवरील विश्वासही किती पराकोटीचा असू शकतो, हेही दिसून आलं… मारुलकर यांचं देणं जितकं श्रेष्ठ तितकाच त्यांचा शिवाजी विद्यापीठावरील विश्वासही अत्यंत सार्थ… गेल्या तीनेक वर्षात ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर, समीक्षक म.सु. पाटील, कवी पंडित आवळीकर यांच्या कुटुंबियांनी अशाच विश्वासानं शिवाजी विद्यापीठास भरीव निधी प्रदान केला, त्यातून त्यांच्याच नावे विविध साहित्य पुरस्कार विद्यापीठाकडून संस्थापित करण्यात आले. काळसेकर कुटुंबियांनी तर सरांची समग्र ग्रंथसंपदाही विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राकडं मोठ्या विश्वासानं सुपूर्द केलीय. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वानं महावीर अध्यासनासाठी भरीव निधी द्यावा, हेही त्या विश्वासाचंच प्रतीक. असं दातृत्वतेज आणि पराकोटीचा विश्वास यांचं आणखी एक उदाहरण मारुलकर दांपत्याच्या रुपानं पाहता आलं, अनुभवता आलं… एखादी किरकोळ रक्कम देणगी द्यायची, तर भलीमोठी अटींची आणि नियमांची जंत्री जोडणारे, त्या माध्यमातून आपलं दानश्रेष्ठत्व कसं सातत्यानं लोकांवर बिंबत राहील, याची चिंता वाहणारे दाते अनेक आले पाहण्यात; पण कोणत्याही अटीविना आयुष्याची पुंजी केवळ मुलीचं नाव जपलं जावं, एवढ्या माफक अपेक्षेनं विद्यापीठाच्या हाती सोपविणारे मारुलकर किती वेगळे उठून दिसणारे! कर्णाच्या दातृत्वाबद्दल आम्ही वाचलंच फक्त, प्रत्यक्षात पाहिलं ते मात्र मारुलकरांना!
अलोक जञाटकर जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
●लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 1900 विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा, तिरंगा, अमृत महोत्सव हे दर्शवून “सामुहिक राष्ट्रगीत” गायले●
▪️ जिल्हा क्रीडा संकुलाचे सगळे वातावरण चैतन्याने बहरून गेले….!●
लातूर, दि. 17 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लातूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहात 8 ऑगस्ट पासून विविध कार्यक्रमांनी साजरा केला. आज 17 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुलात हे ऐतिहासिक असे “सामुहिक राष्ट्रगीत ” प्रत्येक भरतीयाला अभिमान वाटेल अशी देशाच्या नकाशाची, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शविणारी प्रतिकृती देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाला या मुळे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. मी सर्वांचे आभार व्यक्त अशी कृतज्ञता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी व्यक्त केली.
लातूर भारत स्काऊट आणि गाईड कार्यलयाच्या वतीने 3750 चौ.फूट राष्ट्रध्वजाचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये शाहू महाविद्यालयाचे स्काऊट-गाईड, रोव्हर रेंजर सहभागी होते
जिल्ह्यात अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा मोहिम राबविली त्यात आपण आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावलेले होते. ते ध्वज काढल्यानंतर त्या ध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. तसेच राष्ट्रध्वज आपल्या घरी सन्मानाने आणि सुरक्षित ठेवावा. झेंडा खराब झाला, फाटला असेल किंवा जतन करायला अडचण असेल तर तो सन्मानपूर्वक विक्री केंद्राच्या ठिकाणी द्यावा. आम्ही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सन्मानपूर्वक ते झेंडे ठेवू असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
या सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमास जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच देशिकेंद्र विद्यालय, गोदावरी कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम यशस्वी केले, त्यात घरोघरी तिरंगा, प्रदर्शन, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा कार्यक्रम घेतले आहेत. फाळणीच्या आठवणीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. या सर्व कार्यक्रमाची नोंद शासनाने घेतलेली आहे.
यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केला. या समुह राष्ट्रगीत कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलीस उपाअधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे आदि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिक्षक जिल्ह्यातील विविध शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त येथील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरात एकूण १६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या मोफत अस्थिरोग शिबिराचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. बी.व्ही. मोतीपवळे , युवा नेते अभिजित देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या वतीने साहिल अशोक पोद्दार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या वतीने मागच्या सलग १० वर्षांपासून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले जाते. आरोग्यसेवेसोबतच सामाजिक कार्यातही सातत्याने अग्रेसर असणाऱ्या ज्येष्ठ अस्थि शल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांना ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्या समाजप्रतीही आपण काही देणे लागतो, या भावनेने झपाटून टाकले आहे. म्हणूनच ते सातत्याने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याकामी आघाडीवर असतात.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. बी.व्ही. मोतीपवळे यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम डॉ. अशोक पोद्दार यांचा चेहरा येतो, असे मत व्यक्त केले. मोफत आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे जन्मदाते, असा डॉ. पोद्दार यांचा उल्लेख केल्यास कोणालाही नवल वाटू नये, असे सांगून या शिबिराच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचे त्यांनी कौतुक केले. युवा नेते अभिजित देशमुख यांनी यावेळी बोलताना डॉ. अशोक पोद्दार यांच्या आरोग्यसेवेचे तसेच त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्दही नाहीत, असे गौरवोदगार काढले. समाजातील सर्वच स्तरातील रुग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ते सातत्याने अशा प्रकारच्या मोफत शिबिरांचे आयोजन करण्याकामी पुढाकार घेत असतात. समाजातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये, या भावनेने ते आरोग्यसेवा करण्याचे काम करत असतात,असेही त्यांनी बोलून दाखवले. या शिबिरात ३८ रुग्णांची मोफत फिजिओथेरपी करण्यात आली. १८ रुग्णांचे एक्सरे आणि १६ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. तर ८८ रुग्णांची मशिनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली. तसेच हाडांच्या विविध व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णांचीही तपासणी व उपचार करण्यात आले.
या शिबिरास डॉ.चेतन सारडा यांसह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साहिल अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. प्रशांत अभोरे , डॉ. पल्लवी जाधव, वसीम शेख यांसह पोद्दार हॉस्पिटलच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ———————
‘पेडल फॉर नेशन ‘ मध्ये 750 सायकलिस्ट सहभागी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ दीपस्तंभ ‘ चा उपक्रम
लातूर; दि. १६( माध्यम वृत्तसेवा ) – ”भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील ‘दीपस्तंभ ‘ परीवाराच्या वतीने आयोजित ‘ पेडल फाँर नेशन – २०२२ ‘ या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील 750 स्त्री- पुरुष सायकलिस्टनी सायकल चालवून स्वातंत्र्याला अभिवादन केले . अशा प्रकारचा हा देशातील सर्वात मोठा इंव्हेंट होता असेच म्हणावे लागेल .
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ पेडल फाँर नेशन – 2022 ‘ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , पहाटे 5. 30 वाजता बिडवे लाँन येथून या उपक्रमात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. उप जिल्ह्याधिकारी गणेश महाडिकआणि यांनी हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला .75 किलोमीटर , 50 किलोमीटर , 25 किलोमीटर आणि 10किलोमीटर अंतर पार करण्यासाठी भल्या पहाटेपासून मुले – मुली , शाळकरी तरुण – तरुणी व त्यांचे पालक राजीव गांधी चौकाजवळील बिडवे लॉन येथे जमा झाले होते. तिरंगा ध्वज , फुगे , कट आउट्स , सेल्फी पॉईंट , ढोल ताशे अशा विविध स्वरूपाने हा परिसर तिरंगामय व देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला होता.
या उपक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आणि वाँर्मअप साठी सायकलिस्ट कडून प्रिती निसार यांच्या ग्रुपने झुंबा नृत्य करवून घेतले. .चिमुकले, तरुण-तरुणी उत्साहात यात सहभागी झाले होते . दीपस्तंभ परीवाराचे पदाधिकारी , स्वयंसेवक , राजश्री शाहू महाविद्यालयातील प्रा. अनिरुद्ध बिराजदार व विद्यार्थी , शैलेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील एजडी जावा चालक , वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले .तसेच बावगे फिजिओथेरपी काँलेजच्या चमूने सायकलिस्टना फिजिओथेरपी साठी सहकार्य केले. . विवेकांद वैद्यकीय प्रतिष्ठान व दिशा प्रतिष्ठानने फिरता दवाखान्याची अंबुलन्स व डॉक्टर घटनास्थळी तैनात करून सहकार्य केले .अतिशय शिस्तबद्ध व नियोजन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला याबद्दल दीपस्तंभ ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजीव गांधी चौक ते नवीन रेणापूर नाका या रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लातूरकरांनी सायकलिस्टवर पुष्पवृष्टी करून, टाळ्या वाजवून आणि भारतमातेचा जयघोष करून सगळ्यांना प्रोत्साहित केले .ठरवून दिलेले अंतर कापून परत बिडवेलाँन येथे आलेल्या सर्वच सायकलिस्ट यांना मान्यवरांच्या व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते पदक व प्रशस्त्री पत्रकाचे वितरण करण्यात आले . ‘दीपस्तंभ ‘चे अध्यक्ष योगेश कर्वा ,सचिव डॉ. अजय पुनपाळे, प्रमोद भोयरेकर, अमोल चव्हाण,ओमप्रकाश झुरळे , सोनू डगवाले , , शैलेश रेड्डी, व्यंकटेश पवार, रवी सौदागर , प्रा. शिवराज मोटेगांवकर, तुकाराम पाटील, संतोष बिराजदार, व्यंकटेश पवार, रितेश लोया , पप्पू कर्वा , यश कुलकर्णी आदींनी सायकलिस्टना पदकाचे वितरण केले. प्रतिक्षा चव्हाण आणि बालाजी सूळ यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
● भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट साजरा●
●जिल्ह्यात 8 ऑगस्ट पासून विविध उपक्रमात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग,घरोघरीतिरंगा ने जिल्ह्यात पसरले चैतन्य●
●येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव,मोठ्या उत्साहातसाजरा करु●
लातूर, दि. 15 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपलं सर्वस्व त्यागून बलिदान दिलं. काहींनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. त्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन केलं. येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव सुरु होतो आहे. तोही मोठ्या उत्साहात आपल्याला जिल्ह्यात साजरा करु, अशी भावना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी व्यक्त केली.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. शुभेच्छापर देतांना म्हणाले की, अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महान नेत्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दयावी लागली. त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना याप्रसंगी, अभिवादन करुन स्वतंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या देशाने व राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती साधली आहे. सर्व सामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांची उन्नती व त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावेत म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित असल्याचे सांगितले.
लातूर जिल्ह्याबाबत माहिती देतांना ते म्हणाले की, 2022-23 हंगामामध्ये जिल्ह्यातील अधिसुचित पिकासाठी 8 लाख 28 हजार 401 पिक विमा अर्ज करुन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये शेतकरी हिस्सा रक्कम रु 58.65 कोटी प्रिमियम जमा करून 5.65 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पिक संरक्षित केले आहे…या हंगामामध्ये काही सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली असून तेथील पिकाचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सात बाराचे 99 टक्के संगणकीकरण झाले आहे. चावडी दप्तराचेही अद्यावतीकरण सूरू करण्यात आले आहे. त्यामुळे महसूली विभागाचे काम येणाऱ्या काळात वेगवान होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कोविड – 19 मधील मयत झालेल्या 8 अनाथ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत 10 लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत 5 लाख मुदत ठेव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आलेली आहे. तसेच कोविड – 19 मुळे एक पालक गमावलेल्या 359 अनाथ बालकांना प्रति महिना रुपये अकराशे नुसार आतापर्यंत रुपये 19 लाख 57 हजार 700 इतके बाल संगोपन योजनेतंर्गत अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच 49 बालकांना शाळेच्या शुल्क माफीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे, त्यापैकी 10 बालकांची शुल्क माफ झाले असल्याचे सांगून अजूनही कोरोना संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. ज्या पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी आरोग्य विभागाला संपर्क साधून बुस्टर डोसची मात्रा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले.
मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव येत्या 17 सप्टेंबर 2022 पासून ते 17 सप्टेंबर 2023 हे वर्ष मराठवाडा निजामशाहीतून स्वातंत्र्य झाले त्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. लातूर जिल्ह्यातील अनेकांनी या मुक्ती लढ्यात अनमोल योगदान दिलं आहे. त्यांचा त्याग , बलिदान, समर्पण या प्रती विनम्र अभिवादन करण्याचे … त्यांच्या थोर कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे वर्ष असणार आहे. आपण सर्व मिळून हे वर्ष अत्यंत विनम्रपणे विविध उपक्रमातून त्यांच्या स्मृती तेवत राहतील असे काही शाश्वत काम उभं करु या, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रशासकीय पुरस्काराचे वितरण महामहीम राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पूर्ण सेवेचे पोलीस पदक सन -2022 लातूर जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गूलाब महेबूब गूलाम हैदर गल्लेकाटू यांना गौरविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव -2022 अत्यंत नेटके नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी यांचा प्रमाणपत्र देवून यावेळी गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम शिरुर अनंतपाळ, सर्वोकृष्ट क्लस्टर प्रथम अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रथम औसा तालुक्यातील आलमला , राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम निलंगा, सर्वोत्कृष्ट क्लसर औसा तालुक्यातील आलमला, सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रथम चाकुर तालुक्यातील अलगरवाडी महाआवास अभियान-ग्रामीणांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार देशीकेंद्र माध्यविद्यालय, लातूर कु. कलकोटे अथर्व नामदेव, कु. कनगुले प्रदयुम्न बालाजी, कु. स्वामी रुतूजा महेश, कु. काळे निरंजन विनोद, केशवराज माध्यमिक विद्यालय,लातूर कु. शिरुरे इश्वरी दयानंद, कु. चव्हाण पियुश गोकूळ, कु. धुमाळ ओमकार बालाजी, पाटील भरत राजपाल, विद्याविकास माध्यमिक विद्यालय, लातूर कु. गायकवाड अजिंक्य रोहिदास, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल लातूर कु. कदम रोहन दशरथ, बसवनप्पा वाले न्यु इंग्लिश मि. स्कुल, लातूर कु. कुलकर्णी वरुण व्यंकटेश, ज्ञानप्रकाश बालविकास विद्यालय लातूर कु. शारखाने शुभम सतिश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा निवड परिक्षेत यशस्वी झालेल्या 14 विद्यार्थ्यांचा एकाचवेळी सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार मे. गुडवील पॉली प्लास्ट अतिरिक्त उद्योजक सुनिलकुमार उपाध्याय यांना रुपये 15 हजार चा धनादेश गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ , मे. प्रिया इंडस्ट्रिज एम.आय.डी.सी. लातूर येथील सौ. प्रतिभा प्रमोद अंदूरकर रुपये 10 हजार चा धनादेश गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ यांना जिल्हा उद्योग केंद्र लातूर कार्यालयामार्फत वित्तीय वर्षे सन 2019-20 जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार वितरण करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पिटलअंतर्गत विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर लातूर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. गंगाधर बाजीराव सोमवंशी यांनी तुळजापूर ते लातूर आझादी दौड 75 किलोमीटर दौड पूर्ण केल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. आदर्श तलाठी,उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव रेणापूर तालुक्यातील तलाठी सज्जा- रेणापूर येथील गोविंद शिवाजीराव शिंगडे यांना सन 2021-2022 आदर्श तलाठी पुरस्कार प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रुपये 5 हजार, उदगीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, निलंगा तहसील कार्यालयातील येथील नायब तहसीलदार अरुण महापुरे व चाकूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून तर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून डी. एम. माळी, लातूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून डी. आर. सुर्यवंशी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. लातूर शहरातील आय.एस.ओ. नामांकनासाठी पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचा सत्कार श्रुती महिला बचत गट सौ. शुभांगी पद्माकर साखरे दुकान क्रमांक 30, पंचशिला महिला बचत गट सौ. रत्नमाला दिलीप घोडके रास्त भाव दुकानदार म्हाडा कॉलनी, सादीकअली उस्मानसाब शेख दुकान क्रमांक 34, विश्वनाथ गुलाबराव माने दुकान क्रमांक 36, सौ. सुशिलादेवी लक्ष्मण माने दुकान क्रमांक 94 या 05 लातूर शहरातील आय.एस.ओ. नामांकनासाठी पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वीरमाता / वीरपत्नी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूबिंय, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, पत्रकार यांची भेट घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्तच्या चित्रप्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात या “विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे ” उदघाटन दिनांक 14 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्याकाळातले दुर्मिळ फोटो, त्यात गर्दीने भरलेल्या रेल्वे, त्या काळातील या हिंसाचाराचे दैनिकात आलेल्या बातम्या हे सगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती मोठी किंमत मोजली आहे हे प्रदर्शन पाहुन आपल्याला कळेल.. आणि आजच्या स्वातंत्र्याचे मोलही कळेल त्यामुळे आज दि. 15 व 16 ऑगस्ट, 2022 असे दोन दिवस अधिकाधिक नागरिकांनी हे प्रदर्शन पाहावे असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले.
*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मानले सर्वांचे आभार*
लातूर प्रतिनिधी १५ ऑगस्ट २०२२ :
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर व परीसरात इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवार दि. १४ ऑगष्ट २०२२ रोजी महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून जवळपास ३०० पेक्षा अधिक रूग्णालयात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले, काही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी आज सकाळ पासनूच रूग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो रूग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ झाला आहे.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी सर्वांचे आभार मानले
या महाआरोग्य शिबीरातील आरोग्य सेवेच्या या उपक्रमादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. राजकुमार दाताळ यांच्या पद्मानगर मधील सार्थक रुग्णालयास भेट देऊन उपचारासाठी आलेल्या रुग्णांची अस्थेवायिकपणे चौकशी केली, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लातूर येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला, आरोग्य शिबिराच्या आयोजनात सातत्य राखून सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी
ओम साई पॅथॉलॉजीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे केले उद्घाटन
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आज लातूर येथील ओम साई पॅथॉलॉजीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी उद्घाटन केले. तसेच, येथील अत्याधुनिक लॅबची पाहणी केली.
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराच्या यशस्वीतेसाठी इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकूंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडीयन डेंटल डॉ.धनराज शितोळे, होमीओेपॅथी असोशिएशन डॉ. पुरूषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोददार, डॉ. अजय जाधव, डॉ. किणीकर, डॉ. संजय पौळ, डॉ.दिनेश नवगिरे यांच्यासह शहरातील वरीष्ठ डॉक्टर मंडळी यांनी परीश्रम घेतले आहेत. विलासराव देशमुख फांऊडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात आले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबीरात आयएमएचे, दंतवैदयकीय, आर्युवेदीक, होमियोपॅथीक असे एकूण ३०० रूग्णालयांनी सहभागी होवून रूग्णांना सेवा दिली.. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून स्त्री रूग्णालय, लातूर, ग्रामिण रूग्णालय बाभळगाव, ग्रामिण रूग्णालय मुरूड, ग्रामिण रूग्णालय रेणापूर येथे स्त्रियांचे कर्करोग निदान व उपचार करण्यात आले.
या महाआरोग्य शिबीरांच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने तज्ञ डॉक्टर रूग्णसेसाठी उपलब्ध झाले. या ठिकाणी प्रयोग शाळेतील तसेच अदययावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत केल्या तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात करण्यात आले. दुर्धर आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रूगणांना याचा फायदा झाला आहे. या महाआरोग्य शिबीराचा नागरीकांनी लाभ घेतला, या रूग्णांवर मोफत उपचार केले या बददल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले.
*लातूर शहरात महाआरोग्य शिबीरात उपचार केलेले रूग्णालये*
डॅा. रमेश भराटे (छातीरोग तज्ञ) गायत्री सुपरस्पेशालिटी हॅास्पीटल,( ५०% सवलतीच्या दरात तपासणी), आरदवाड हॅास्पीटल, डॅा अशोक आरदवाड डॅा धर्मराज दुड्डे (बालरोगतज्ञ) (मोफत बालरूग्ण तपासणी), श्रीमती फुलाबाई भाऊसाहेब बनसुडे हॉस्पीटल, डॉ.अशोक गाणु, डॉ. मोहीनी गाणु, डॉ.अरुणकुमार राव, डॉ.बालाजी डेंगळे डॉ.जे.के.देशमुख, डॉ.राहुल सुळ, डॉ.ज्योती सुळ (मोफत सल्ला, प्रयोगशाळा चाचणीवर 50 टक्के सवलत एक्स रे, सोनोग्राफीवर 10 टक्के सवलत), डॉ दुबे बी जी, न्यू लाइफ हार्ट आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ( ह्रुदयरोग निदान उपचार 50% दरात 2 डी इको आणि टी एम टी) डॉ.अरविंद भातांब्रे (भातांब्रे हॉस्पीटल, निलंगा), डॉ.इम्रान जमादार, जमादार आय हॉस्पीटल (मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पेटरीजियम शस्त्रक्रिया व मोफत सल्ला 50 टक्के सवलत, डॉ.ओमप्रकाश भोसले, भोसले हॉस्पीटल, अशोक हॉटेलजवळ, लातूर, डॉ.आनंद पाटील, पाटील स्कीन केअर हॉस्पीटल, बसस्टँडसमोर, लातूर, डॉ.सुधीर पोतदार पोतदार हॉस्पीटल, उद्योगभवन रोड, लातूर (रक्त तपासणी ५०% सूट मोफत फिजीओथेरपी डिजिटल एक्सरे ५०% सूट मोफत), डॉ.अनिल कोल्हे, कोल्हे हॉस्पीटल, लातूर, डॉ नितीन बरडे, डॉ धनंजय पडवल, डॉ एस बी पाटील, यशोदा मल्टीस्पेसिऍलिटी हॉस्पिटल, (मोफत आरोग्य तपासणी) डॉ मनीषा हलकांचे डॉ गजानन हलकांचे डॉ आकाश स्वामी साई हॉस्पिटल अँड क्रेटिकल सेंटर (मोफत ब्लड शुगर तपासणी), डॉ पुष्कराज बिराजदार डॉ अमृता बिराजदार, अपोलो न्यूरो केअर अँड सुपर स्पेसिलिटी हॉस्पिटल मोफत (मोफत आरोग्य तपासणी) डॉ.किरण डावले डॉ निलेश भांगे डॉ एजाज शेख कोणार्क सुपरस्पेसिलिटी हॉस्पिटल (मोफत आरोग्य तपासणी शिबीर), डॉ कल्याण बरमदे डॉ मनीषा बरमदे डॉ दीपा कुलकर्णी,डॉ श्वेता मुद्दे डॉ नेहा शेख,बरमदे हॉस्पिटल लातूर (स्त्रीरोग तपासणी हाडाच्या ठिसूळतेची तपासणी आणि पेल्विक सोनोग्राफी मोफत), डॉ.भालचंद्र दळवे, दळवे हॉस्पीटल लातूर, डॉ शिवराज कंठीकर, डॉ पूनम पावले (चिपडे) डॉ. कल्पना जाजू निर्णय डायग्नॉस्टिक सेंटर, लातूर (ब्लड शुगर विनाशुल्क तपासणी ( free blood sugar), डॉ. रमण महाळंगीकर.डॉ. हर्षद चिपडे.डॉ. शितल वाघ, मॅक्स न्यूरोकेअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल & डेंटल केअर, लातूर. ( मोफत आरोग्य तपासणी ), डॉ. मनिषा सुर्यकांत शेटे ( हलकंचे) श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर ( मोफत शिबिर), डॉ.संजय शिवपुजे, शिवपुजे हॉस्पीटल, लातूर, डॉ. मीरा मा. शिंदे. (येवले ) शिंदे हॉस्पिटल व प्रसुती गृह ( स्त्रीरोग मोफत आरोग्य तपासणी ), डॉ. आनंद गोरे, कान नाक घसा व दंत हॉस्पिटल (मोफत आरोग्य), डॉ मंजूलता बाहेती, डॉ बी. बी. बाहेती बाहेती हॉस्पिटल, मुरुड, डॉ. विश्रांत भारती, डॉ. शिरीष पाटील, डॉ. गजानन चव्हाण, डॉ.श्वेता भारती डॉ. अमृता पाटील डॉ. अमृता चव्हाण, गॅलॅक्सी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर सेंटर, डॉ अमित उटीकर, डॉ अभय कदम, डॉ.आशुतोष पावले, डॉ महेश उगले, युरेका स्कॅन सेंटर (सवलतीच्या दरात सिटी स्कॅन) , डॉ.चाँद पटेल, केअर मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर (मोफत रक्तदाब मधुमेह तपासणी), डॉ प्रमोद मुळे, मुळे हॉस्पिटल मोफत (रक्तदाब मधुमेह तपासणी), डॉ.विवेक यार्डीकर, हायटेक इनस्टीट्युट अॅड इमेजिंग सेंटर, लातूर (CT-SCAN AND MRI ५०% सवलतीच्या दारात), डॉ सदानंद कांबळे, डॉ तृप्ती कांबळे, गोदावरी मल्टिस्पेसिलिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ हणमंत किणीकर डॉ शशिकांत कुकाळे डॉ अमितकुमार भालेराव डॉ राजेश बोंबडे डॉ कल्पना किणीकर डॉ ऋषिकेश नलावडे डॉ शीतल तळीखेडकर डॉ संगीत कदम, सह्याद्री मल्टि स्पेसिलिटी ऍक्सिडेंट अँड नुरोकेअर सेंटर (५०% सवलतीच्या दारात 2D ECO,TMT,MRI,CT-SCAN,SONOGRAPHY HBOT), उमंग इन्स्टीट्युट ऑफ अॅस्टीम अॅड मल्टीडिसॅबीलिटी रिसर्च सेंटर, लातूर, उटगे चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर, डॉ एस.एन. जटाल, डॉ सुधीर जटाल, जटाळ हॉस्पीटल अॅड रिसर्च सेंटर, लातूर, डॉ संजय पाटील (पौळ) लोटस चिल्ड्रन सर्जरी व ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल (मोफत बालरोग तपासणी), डॉ. महेश उगले डॉ. दिग्विजय कलमे, निर्णय सोनोग्राफी सेंटर (सर्व सोनोग्राफी ५०% सवलतीच्या दारात), डॉ सुधीर फत्तेपूरकर, डॉ गीता फत्तेपूरकर, डॉ रेखा कर्डीले, डॉ दीपक पाटील अश्विनी ऍक्सिडेंट अँड नुरोकेअर सेंटर सदभावना नगर, औसा रोड, लातूर (मोफत मानक आणि मेंदू रोगनिदान), डॉ. रुद्रमणी षडाक्षरी स्वामी,विराज जाधव, सर्वज्ञ मल्टिस्पेसिलिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ रामेश्वरी अल्हाबादे, डॉ.प्राची रुईकर ,डॉ राजश्री गुंडांवर डॉ विश्वास कुलकर्णी डॉ अमोल लोंढे डॉ एजाज शेख, ममता हॉस्पिटल अँड आई व्हीफ सेंटर (मोफत वंधत्व निवारण तपासणी), व्हीजन डिग्नोस्टिक सेंटर (25% DISCOUNT ON CT-SCAN,MRI USG,MAMOGRAPHY), डॉ.चंद्रज्योती बंडखडके, डॉ.गणेश बंडखडके, अंकुर हॉस्पीटल, लातूर FREE GYNECOLOGICAL AND INFERTILITY CAMP ,चेतन सारडा, सदासुख हॉस्पीटल, मेन रोड, लातूर, डॉ.राजेंद्र दाताळ, सार्थक हॉस्पीटल, लातूर, डॉ.परमेश्वर शिंदे, डॉ.प्रिया रोकडे, डॉ.प्रविण रेड्डी जे.जे.हॉस्पीटल, लातूर मोफत आरोग्य तपासणी, डॉ.दिनेश वर्मा, डॉ.सी.रघु ,डॉ.विनोद चिंदे अल्फा सुपरस्पेसिलिटी हॉस्पिटल मोफत (हृदय रोग निदान व अँजिओग्राफी शिबीर ५०% सवलतीच्या दरात), डॉ.सोमवंशी जी.आर. डॉ.शुभांगी सोमवंशी, सोमवंशी अक्सीडेंट हॉस्पिटल व प्रसुतीगृह (मोफत अस्थिरोग व स्त्रीरोग तपासणी), डॉ. इम्रान जमादार, जमादार नेत्र रुग्णालय, लातूर. (मोफत नेत्र तपासणी व माफक दरात शस्रक्रिया), डॉ. गडदे, गडदे हॉस्पिटल, लातूर. (मोफत कॅन्सर रोग निदान व उपचार), डॉ. राजेश एनाडले, प्रभावती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, लातूर मोफत आरोग्य तपासणी शिबिर ५०% सवलतीच्या दारात LAB,X-RAY,ECG , डॉ.दिपक गुगळे, गुगळे हॉस्पीटल, लातूर डॉ सुरेश भट्टड डॉ शीतल भट्टड, भट्टड धर्मादाय (बाल ) रुग्णालय (मोफत बालरोग तपासणी), डॉ. अतूल देशमुख, निवारण स्कॅन सेंटर, लातूर, डॉ.संगमेश चौंडा, चौंडा हॉस्पीटल, लातूर पाण्याच्या टाकी जवळ बार्शी रोड लातूर, डॉ.उमेश केंद्रे, ओमसाई पॅथोलॉजी लॅब, लातूर, डॉ.अजय पुनपाळे, लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, लातूर, डॉ.गौरव सोमाणी, नंदी स्टॉप, लातूर, डॉ.हनुमान चांडक, चांडक हॉस्पीटल, मुरुड, डॉ.इंद्रजित लकडे, रक्षा हॉस्पीटल, लातूर, डॉ.कृष्णा मंदाडे, मंदाडे हॉस्पीटल, बार्शी रोड, लातूर, डॉ.महेश पाटील, पाटील हॉस्पीटल, लातूर, डॉ.मिरा शिंदे, विवेकानंद चौक, लातूर, डॉ.निलेश नागरगोजे, लातूर, डॉ.प्रमोद घुले, आयकॉन हॉस्पीटल, लातूर, डॉ.देवाशिष रुईकर, रुईकर हॉस्पीटल, लातूर, डॉ.गणपती सोमवंशी, अंबाजोगाई रोड, लातूर, डॉ.प्रदिप कोकले, ओंकार हॉस्पीटल, लातूर (मोफत कान,नाक, घसा तपासणी), डॉ.वर्धमान उदगीरकर, डॉ.संदीपान साबदे, श्वास हॉस्पीटल, लातूर, डॉ.उल्हास महाजन, साई मंदीरजवळ, विशाल नगर, लातूर, डॉ.वैशाली टेंकाळे, सावेवाडी, लातूर, आमदार आय हॉस्पीटल, शाखा-2 एलआयसी ऑफीस रोड, जुना रेणापूर नाका, लातूर, डॉ. अमित उटीकर , डॉ. स्वप्ना उटीकर निदान डायग्नॉस्टिक सेंटर, लातूर (ब्लड शुगर , HB1 AC, लिपिड, युरीन, थायरॉईड – 50 % सवलत), डॉ.जगदीश झाडके, डॉ.अश्विनी झाडके, झाडके डेंटल क्लीनीक, मुरुड (मोफत दंत तपासणी व सल्ला) डॉ निलेश नागरगोजे, डॉ.निहारिक नागरगोजे आस्था न्यूरो केअ,(मोफत मेंदूविकार व स्त्री रोग तपासणी), डॉ.पुनम केदार, जोशी स्टडी सेंटरच्या समारे, जुना औसा रोड, लातूर,डॉ.स्नेहा गारटे नळेगाव ता.चाकूर जि.लातूर, डॉ.सुशिल सोळुंके, जयप्रकाश नगर, नांदेड रोड, उदय पेट्रोल पंपाजवळ, उदगीर जि.लातूर, डॉ.हेमा राजमाने, साई सरस्वती अपार्टमेट, सरस्वती कॉलनी, डॉ.श्याम कानवते, अंबा हनुमान पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर, डॉ.शितल नाईकनवरे, आकाश निवास, पोलीस स्टेशन पाठीमागे, विद्या नगर, मुरुड, डॉ.सोनाली अग्रोया, अल्फा हॉस्पीटल, शाम नगर, लातूर, डॉ.माधरी अग्रवाल, डॉ.गणेश कोटलवार, कोटलवार डेंटल क्लीनीक, बाजुस चित्तीकिरण हॉटेल, लातूर
*निमा अंतर्गतची उपचार केलेले रूग्णालये*
डॉ. दयानंद मोटेगावकर खाडगाव रोड, लातूर, डॉ. मनोज देशमुख देशमुख हॉस्पीटल, दत्त नगर, लातूर डॉ. विनोद कोराळे मातोश्री क्लीनीक, रिंग रोड, लातूर डॉ. महेश कदम साई नाका, साई रोड, लातूर डॉ. बालाजी सोळंके पंचशिल चौक, जुना एमआयडीसी रोड, लातूर डॉ. आदम शेख मुरुड, डॉ. शिवाजी बिराजदार मोतीनगर, कन्हेरी रोड, लातूर डॉ. चंद्रकांत चाटे विवेकानंद चौक, लातूर डॉ. पंडीत ढगे सुतमिल रोड, लातूर, डॉ. प्रज्ञा घोडके विवेकानंद चौक, लातूर, डॉ.गोपाळ वैजवाडे औसा रोड, लातूर, डॉ. गुरु राजुरकर, तांदुळजा ता.जि.लातूर, डॉ.विनोद कदम विवेकानंद चौक, लातूर डॉ.सी.टी.कांबळे जानवळ ता.चाकूर, डॉ.जागृती खरटमोल लक्ष्मी कॉलनी, लातूर डॉ.राहुल महाजन खोरी गल्ली, लातूर डॉ.महेश सांडूर शाहु चौक, लातूर, डॉ.बालाजी माने पाटील, संजीवनी हॉस्पिटल, मुरुड, डॉ.शिला टेंकाळे विवेकानंद चौक लातूर, डॉ. संदिप राजहंस मुरुड, ता.लातूर, डॉ.रमेश बगडे सिध्देश्वर मंदीजवळ, लातूर डॉ.रणदिवे मुरुड ता.लातूर डॉ.विनोद राठोड बसस्टँजवळ, लातूर डॉ.वसिम सय्यद मुरुड ता.लातूर डॉ.निलकांत सोनटक्के खाडगाव रोड, लातूर, डॉ.उल्हास साळुंके जोडजवळा ता.लातूर, डॉ.योगेश फेरे मुरुड ता.लातूर, डॉ.महेश देशमुख मुरुड ता.लातूर, डॉ.विजय पुरी मुरुड ता.लातूर, डॉ.संदिप क्षीरसागर, डॉ.सतिश बंडगर शिवाजी चौक, लातूर डॉ.शिरीष कडतने बार्शी रोड, लातूर डॉ.स्मिता फडणीस नारायण नगर, लातूर डॉ. सुनिल चव्हाण संजीवनी हॉस्पीटल, औसा डॉ. प्रमोद हातगले निलंगा डॉ. मुकूंद भालेराव विवेकानंद चौक, लातूर डॉ.विनोद कदम विवेकानंद चौक, लातूर डॉ.आशिष पाटील औसा रोड, लातूर डॉ. इंद्रनिल मोरे जुना औसा रोड, लातूर डॉ.उध्दव गिरी सुतमिल रोड, लातूर डॉ. खिल्लारे खाडगाव रोड, लातूर
समाजाच्या प्रगतीसाठी यलम मित्र सेवा संस्थेच्या वतीने
आखलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल
गुणवंत विद्यार्थ्यी सत्कार सोहळयात
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची ग्वाही
लातूर प्रतिनिधी १५ ऑगस्ट २०२२ :
लातूर जिल्ह्यात राजकारण असो की समाजकारण या क्षेत्रात काम करताना आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी कायम गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. आपण सर्वजण त्याच संस्कारात वाढलेले असल्यामुळे ती परंपरा आज सुरू ठेवली आहे आणि भविष्यात ही ती कायमपणाने चालवली जाईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यलम समाजाच्या वतीने आयोजित गुणवंताच्या सत्कार सोहळयास बोलतांना दिले. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी यलम समाजाने जे संकल्प केले आहेत, ज्या ज्या योजना आखल्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
लातूर येथे यलम समाजाच्या वतीने आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे यलम मित्र सेवा संस्थेच्या वतीने आयोजित यलम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अमित देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा, वैदयकीय प्रवेशाची नीट परीक्षा, इयत्ता पाचवी, दहावी व बारावी परीक्षेतील अनुसया नागिमे, कैवल्य गोजमगुंडे, सचिन बरुरे, अक्षय नलवाडे, दिपाली मोरामपल्ले, रिशा जटाळ, मधुरा बडगिरे, डॉ. रितेश कोतवाल आदी विद्यार्थ्यांचा तसेच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रा.शिवराज मोटेगावकर, सुनील कुंठे, डॉ. रामभाऊ बरुरे, सचिन कासले आदींचा विशेष सत्कार करण्यात आला तर विलास गुरमे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, डी.एन.शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रा. शिवराज मोटेगावकर, माजी नगरसेवक रवी सुडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, यलम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, यलम समाज भारत व महाराष्ट्रात संख्येने कमी आहे, तरी यलम समाजाने उल्लेखनीय कामगिरी केली ती अनन्यसाधारण कौतुकास्पद आहे. या समाजाशिवाय राजकीय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. लोकनेते विलासराव देशमुख यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले त्याला पुढे आणले हा विचार त्यांनी जोपासला तोच विचार मी आणि माझे सहकारी पुढे घेऊन जात आहोत. लोकनेते विलासराव देशमुख यांनी विक्रम गोजमगुंडे यांना लातूरचे नगराध्यक्ष केले, नामदेवराव पाटील यांना संचालक केले, विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे महापौर झाले यलम समाजाने याचा विचार केला पाहिजे आम्ही गुणवत्ता पाहिली गुणवंत विद्यार्थ्यांना मी मदत करतो त्यांचे नावे मला कळवा या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे आपल्या समाजातील गुणवंत पुढे येत आहेत याचेही आम्हाला कौतुक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, यलम समाजाच्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हावे यासाठी आम्ही तत्पर आहोत, लातूर जिल्ह्यासाठी जे काही करावे लागेल ते करू लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारानी आपण वाढलो असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम बरुरे यांनी करून यलम मित्र सेवा संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, डी.एन.शेळके, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत आरडले व कातपुरे मॅडम यांनी केले.
लातूर दि.१५– भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा दिन माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे सोमवार दि. १५ आँगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरवर्षी देण्यात येणारा कै. मोनिका ढाका पुरस्कार इब्राहिम जाकीर तांबोळी (२०२२) आणि रसिका रामेश्वर सेलूकर (२०२१) तर उत्कृष्ट गुणवंत विद्यार्थी पुरस्कार अनुराधा वागलगावे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. एमआयटी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालिका डॉ. सरिता मंत्री, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, डॉ अरुण कुमार राव, डॉ चंद्रकला पाटील, डॉ विद्या कांदे, डॉ सचिन भावठाणकर, डॉ मुकुंद भिसे, डॉ एस एस कुलकर्णी, डॉ आशा पिचारे, डॉ. फिरोज पठाण यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिपांकर दत्ता, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबई महापालिका आयुक्त ईक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला आज ध्वजारोहणाची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच – पावणे तीन वर्षात कोविडच्या भयंकर विषाणूने आपल्याला बंदिस्त केले होते. आज संकट पूर्णपणे गेलेले नाही, पण या विषाणूने घातलेल्या बेड्या आपण सगळ्यांनी तोडल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण उत्साहाने साजरा करतो आहोत तसेच येणारा गणेशोत्सव, दहीहंडी किंवा इतर धार्मिक सण देखील आपण नेहमीप्रमाणे काळजी घेऊन पण जल्लोषात साजरे करणार आहोत.
सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे यांना पहिले प्राधान्य
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपले राज्य आज पूर्णपणे तिरंग्यात न्हाऊन निघाले आहे. घरोघरी तिरंगा दिसतो आहे. मुख्य म्हणजे नागरिकांनी स्वत: उत्स्फूर्तपणे यात भाग घेतला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आमचे पहिले प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे घटक आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत
गेल्या दोन महिन्यात राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. आम्ही तातडीने प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी दिल्या. प्रशासनाला निर्देश दिले, त्याप्रमाणे वेगाने पंचनामे सुरू झाले. २८ जिल्ह्यांना फटका बसला असून १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येते, ती वाढवून ३ हेक्टर मर्यादेत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पूर-अतिवृष्टीवर कायमस्वरूपी इलाज हवा
पूर, अतिवृष्टी यावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय करण्यासाठी आम्ही जलसंपदा विभागामार्फत नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
आरक्षणासाठी सरकार गंभीर
ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळाले आहे. सारथी आणि महाज्योती या संस्थांना आम्ही बळकट करीत आहोत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘अमृत’या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे.
गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितले आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
केंद्र शासनाचा संपूर्ण पाठिंबा
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी आम्ही बोलतो आहोत. मा. प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्री महोदय यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. केंद्राच्या योजनांची आणि कार्यक्रमांची राज्यात सर्वात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे, असे निर्देश आम्ही प्रशासनाला दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
शेतीला प्रोत्साहन
पीक पद्धतीत बदल विविधीकरण, सिंचन व्यवस्था बळकट करणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे यातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करणार आहोत. यासंदर्भात नुकतीच नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राची भूमिका मी परखडपणे मांडली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षक राहणार नाही, असे नियोजन आम्ही केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी
राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएम गती शक्ति मॉडेलचा उपयोग देखील आम्ही करणार आहोत. राज्यात ग्रीन फिल्ड शहरे निर्माण करण्यावर भर देत आहोत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल यात काही शंकाच नाही. येत्या काही दिवसांत या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल.
पाणी, घरे यांना प्राधान्य
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशनसारख्या योजनेची ७५ टक्के अंमलबजावणी झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून आम्ही बेघरांना निवारा दिला आहे. पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
कौशल्य विकासास प्राधान्य
राज्यात उद्योग- रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच रतन टाटा व इतर उद्योजकांशी भेट घेऊन चर्चा केली आहे. कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत. आज सकाळीच मी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला झेंडा दाखवून सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन
कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन करणे सुरू आहे.
गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतले आहेत. लोकांच्या हिताची कामे थांबविलेली नाहीत. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देत आहोत. विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहोत. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांतील भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती दिल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दुसरा टप्पा राबविणार आहोत. प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी घातली आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे प्रकल्पांना वेग आलेला दिसेल.
आज कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे हयगय करू नका. कोविड लसीमुळे या जीवघेण्या संकटातून संरक्षण मिळते आहे हे कृपया लक्षात घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ००००