33.6 C
Pune
Saturday, May 16, 2026
Home दिन विशेष जागतिक कुटुंब दिनाची सुरुवात

जागतिक कुटुंब दिनाची सुरुवात

0
546

करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जागतिक कुटुंब दिन साजरा होत असल्याने त्याला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. खरे म्हणजे भारतासारख्या देशात कुटुंब दिन वगैरे रोजच साजरे होत असतात. भारतातील कुटुंब पद्धती, प्राचीन परंपरा, चालिरिती यांमुळे कुटुंबवत्सल देशात मुद्दाम कुटुंब दिन साजरा करावा लागत नाही.

• हे विश्वचि माझे घर :

मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर, ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, परकीयांचे अंधानुकरण, सोशल मीडियाचा वाढता प्रचार, प्रसार, ट्रेंड यांमुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेला वेगळीच दिशा मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळते. व्हॉट्स ॲप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरून नाईलाजाने किंवा अन्य काही कारणांमुळे विभक्त झालेली कुटुंबे पुन्हा एकदा आभासी जगाच्या माध्यामातून एकत्र आली आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर कौटुंबिक मैफिली रंगू लागल्या.

जागतिक कुटुंब दिन :
आज जागतिक कुटुंब दिनानिमित्त SOS बालग्राम लातूर यांच्या वतीने आयोजित जागतिक कुटुंब दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग लाभला …
येथील मुलामुलींनी आपल्या कुटूंबाचा वटवृक्ष दर्शवणारे अतिशय सुंदर असे भित्तीचित्रे रेखाटली होती, त्यांना संस्थेच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहन पर पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते….
या बालमित्र मैत्रिणींना श्यामची आई हे पुस्तक,विचार व संस्कारांचा वारसा भेट स्वरुपात दिले,या चिमुकल्यांचा अद्भुत आनंद अनुभवला.


अजय घोडके
@unita deshmane
SOS Children Village, Latur,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]