Homeठळक बातम्या*मोदी @९ अभियानांतर्गत भोपाल रॅलीसाठी राजेंद्र पाटील यांची निवड*

*मोदी @९ अभियानांतर्गत भोपाल रॅलीसाठी राजेंद्र पाटील यांची निवड*

इचलकरंजी : प्रतिनिधी

मोदी @९ अभियानांतर्गत “भोपाल रॅली” या संघटनात्मक कामकाजासाठी महाराष्ट्रातून ३३ पदाधिकाऱ्यांची आणि संपूर्ण भारतातून २५०० पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे इचलकरंजी विधानसभा विस्तारक राजेंद्र बंडू पाटील यांची निवड झाली आहे .या निवडीसाठी
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ,माजी आम. सुरेश हाळवणकर इचलकरंजी शहर भाजप शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांचे सहकार्य लाभले

येथील राजेंद्र पाटील हे भाजपा इचलकरंजी विस्तारक असून संघटनात्मक कामकाजामध्ये कित्येक वर्ष प्रामाणिक निष्ठेने आणि पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन तन आणि मन अर्पण करून कार्य करत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची
मोदी @९ अभियानांतर्गत “भोपाल रॅली” या संघटनात्मक कामकाजासाठी निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र पाटील हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीस
उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते दि. २४ जून ते ७ जुलै या कालावधीमध्ये मोदी @9 अभियानांतर्गत “भोपाल रॅली” या संघटनात्मक कामकाजासाठी
आपले योगदान देणार आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर , शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल त्यांचे
विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments