लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिना निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन
२०० पेक्षा अधिक हॉस्पिटल्स, २००० पेक्षा अधिक डॉक्टरांचा सहभाग:
गरजू रुग्णांची मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया
*लातूर (प्रतिनिधी) : बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लातूरचे सुपुत्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आरोग्यसेवेतून आदरांजली अर्पण करण्यासाठी आयएमए, लातूर, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, निमा आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट रोजी १४ आणि रोजी लातूर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि डॉक्टरांच्या वतीने २०० पेक्षा अधिक रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी आवश्यकतेनुसार उपचार, विशेष सवलतीच्या दरात काही तपासण्या व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत.इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, निमा (NIMA) आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातूर जिल्हा आणि महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रमातून त्यांच्या आठवणी आणि कार्याचा उजाळा दिला जातो. लोकसेवेचा वारसा आरोग्यसेवेतून पुढे चालवण्याची परंपरा लातूर येथील विविध आरोग्यसेवा संघटनांच्या वतीने चालवण्यात येत आहे. मागच्या १३ वर्षात कोविड महामारीचे सन २०२० वर्ष वगळता सातत्याने १२ वर्षे हे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. दरवर्षी या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची आणि डॉक्टरांची संख्या वाढत आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये सन २०२४ मध्ये ६५ रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. तर सन २०२५ मध्ये ७०, सन २०२६ मध्ये ८८, सन २०१७ मध्ये १०१, सन २०१८ मध्ये १४७, सन २०१९ मध्ये १५०, सन २०२२ मध्ये २००, सन २०२२ मध्ये ३१०, सन २०२३ मध्ये ३००, सन २०२४ मध्ये २००, सन २०२५ मध्ये २०४ घेतला. मात्र सन २०२० मध्ये कोविड-१९ महामारीमुळे शिबिर घेता आले नव्हते.आणखीही सहभाग वाढतो आहे. उद्या पर्यंत या सहभागी रुग्णांची संख्या खूप मोठी होईल अशी अपेक्षा आहे.
एकंदरीत रुग्णालयांची वाढती संख्या लक्षात घेता या आरोग्य शिबिरांत सहभागी होणाऱ्या अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व दंत वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत वरिष्ठ डॉक्टरांनी आणि तरुण तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या १००० पेक्षा अधिक होल आहे. महाआरोग्य शिबिरात साथीचे रोग; हृदयरोग, कॅन्सर आदिसारख्या खर्चिक आजारांचीही तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.या महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णालयात १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून शिबिराचा शुभारंभ होईल त्यानंतर रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे.
लातूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती, डॉ. मनसूर भोसमे, डॉ. श्वेता पवार, डॉ. आकांक्षा त्रिपाठी, निमाचे अध्यक्ष डॉ. बालाजी साळुंके, विनोद कदम, डॉ. महेश सांडूर, होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अम्रपाली देशमुख, सचिव डॉ. अक्षयनी लाखवीदे, डॉ. पुरुषोत्तम दरक, डॉ. संजय गव्हाणे, डॉ. दिनेश नवगिरे, डॉ. राजेंद्र बाहेती मुरुड, दंतवैद्यकीयचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार बिराजदार, सचिव डॉ. शैलेश पडगीलवार, खजिनदार डॉ. साफल्य कडतने आदी पदाधिकारी महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी समन्वयक भूमिका पार पाडत आहेत, परिश्रम घेत आहेत. डॉ. सोपान जटाळ, डॉ. अशोक पोतदार, डॉ. संदीप कणकवट, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. हमीद चौधरी, डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यासह स्पेशल मंडळीचे या शिबिर आयोजनात मार्गदर्शन लाभत आहे.
*आरोग्य सेवेतून आदरांजली :अनोखा उपक्रम*
*आमदार अमित देशमुख* लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आरोग्यसेवेतून आदरांजली अर्पण करण्याचा अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व दंत वैद्यकीय या संघटनांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध आरोग्य संघटनांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा महाआरोग्य शिबिराचा उपक्रम आगळावेगळा ठरतो आहे. यातून लातूर व परिसरातील सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य घडते आहे. या सर्व आरोग्य संघटनांचे आणि सहभागी डॉक्टरांचे लोकप्रतिनिधी या नात्याने मी मनस्वी आभार व्यक्त करीत असल्याचेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
*संपूर्ण जिल्ह्यात नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन* *खासदार डॉ. शिवाजी काळगे*
आयएमए व इतर आरोग्य संघटनांच्या आवाहनाला अनुसरून लातूर येथे माझ्या लक्ष्मी नेत्रालयासह जवळपास सर्वच नेत्ररुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून अहमदपूर येथील डॉ. रामेश्वर चामले, उदगीरचे येथे डॉ. तानाजी मोरे, निलंगा येथे डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या रुग्णालयातही नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटले आहे. लातूर शहर व जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या वतीने आयोजित शिबिराचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केले आहे.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आरोग्यसेवेतून आदरांजली अर्पण करण्याचा अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व दंत वैद्यकीय या संघटनांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध आरोग्य संघटनांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा महाआरोग्य शिबिराचा उपक्रम आगळावेगळा ठरतो आहे. यातून लातूर व परिसरातील सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य घडते आहे. या सर्व आरोग्य संघटनांचे आणि सहभागी डॉक्टरांचे लोकप्रतिनिधी या नात्याने मी मनस्वी आभार व्यक्त करीत असल्याचेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
—————————–

–




