विलासराव देशमुख स्मृती दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर

0
150

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आय एम ए ,निमा,आय डी ए,व होमिओपॅथी असोसिएशन संघटनेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन


लातूर ;( माध्यम वृत्तसेवा):– महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट २०२५ रोजी आय एम ए ,निमा,आय डी ए,व होमिओपॅथी असोसिएशन संघटनेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व पॅथीच्या १७४ डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे .शिबिराचा लाभ लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभय कदम, महिला विंग अध्यक्षा डॉ.ज्योती सुळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केले.


यावेळी आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉ अभय कदम सचिव डॉ ऋषिकेश हरिदास आय एम ए महिला विंग अध्यक्ष डॉ ज्योती सुळ सचिव डॉ. प्रियंका डावळे डॉ. अशोक पोद्दार डॉ.रमेश भराटे डॉ अशोक पोद्दार, डॉ शिल्पा लाटुरिया, डॉ. उत्तम देशमाने डॉ.नीलम पन्हाळे ,डॉ.पुरुषोत्तम दरक,डॉ. दिपक गुगळे,डॉ. बालाजी साळुंखे डॉ हमीद चौधरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरामध्ये मोफत अस्थिरोग तपासणी ,मोफत सल्ला ,मोफत औषधी, मोफत मशीन द्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी; तसेच रक्त तपासणी मध्ये, डिजिटल एक्स-रे मध्ये आणि ऑपरेशन चार्जेस मध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे ,अशी माहिती अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली. या शिबिरामध्ये डॉ. सिद्धार्थ अय्यर ,डॉ. इमरान कुरेशी, डॉ. मंगेश कुलकर्णी ,डॉ. प्रीतम ,डॉ. पल्लवी जाधव आदी तज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करून योग्य तो सल्ला देणारे आहेत.


आय एम ए व इतर संघटनांच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून लोकनेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये १७४ हून अधिक डॉक्टरांचा सहभाग हा उत्स्फूर्तपणे असतो यामध्ये विविध प्रकारच्या उपलब्ध सुविधा त्यामध्ये मोफत ,50 टक्के व जे शक्य होईल तशा सवलती दिल्या जातात जे रुग्ण या शिबिरामध्ये आपले नाव नोंदणी करतील सहभागी होतील अशांना कालावधी संपल्यानंतर ही या सुविधांचा लाभ दिला जातो त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या चाचण्या तपासण्या व उपलब्ध शिबिरातील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आय एम ए ,निमा,आय डी ए,व होमिओपॅथी असोसिएशन संघटनेच्या लातूर यांच्यावतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.


लोकनेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूर साठी भरपूर काम केला आहे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम लातूर साठी केले आहे या सर्व गोष्टींचा फायदा डायरेक्ट इन डायरेक्ट हा सर्वांना झालेला आहे व्यापारी विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर सर्व क्षेत्रातील नागरिकांना साहेबांनी केलेल्या कामाचा फायदा झाला आहे.लातूरचे नाव देश पातळीवर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांच्यामुळे ओळखलं जातं ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे अशा प्रकारची शिबिरे कोठेही होत नाहीत या महाआरोग्य शिबिराची नोंदणी गेल्या आठ दिवसापासून सुरू असून त्याचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

हे महाआरोग्य शिबिर गेल्या बारा वर्षापासून सुरू आहे महाआरोग्य शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन डॉक्टरांनी केलेले कार्य आहे. 174 डॉक्टरांनी या महारोगे शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे नागरिक हे आपले रुटीन चेकअप करत नाहीत काही नागरिक अचानक दगावले जातात आपल्यामध्ये काही दोष आहेत हे नंतर समजले जाते त्यामुळे नागरिकांनी आपले चेकअप करून घ्यावे आजारांचे वेळीच निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते दुर्लक्षित नागरिकांसाठी चांगली संधी आहे यामध्ये सर्व पॅथीचे डॉक्टर उपलब्ध आहेत या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आव्हान आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अभय कदम यांनी केले आहे. यावेळी डॉ. अशोक पोद्दार ,डॉ. बालाजी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन आयएमए संघटनेचे सचिव डॉ ऋषिकेश हरिदास यांनी केले तर आभार महिला आय एम ए विंगच्या सचिव डॉ. प्रियंका डावळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here