श्रीरंगा हे नवीन मराठी गीत रसिकांच्या सेवेत सादर
भारतीय संगीत नेहमीच रसिकांना भुरळ घालत असतं. कालमानानुसार त्यात विविध बदल होत असलेले दिसतात. जसं गायनाच्या पद्धतीत बदल होत आहेत, त्याचप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञानाचा, वाद्यांचा, दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून शब्दांना अधिकाधिक परिणामकारकता देण्याचा कल आजच्या गायक-संगीतकारांमध्ये आढळतो.
औरंगाबाद येथील गायिका- संगीतकार वैशाली राजेश यांनी हैदराबाद येथील कवी- गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांचं एक गीत रसिकांसाठी नुकतंच सादर केलंय. सुंदर, तरल शब्दरचना, उत्तम संगीत आणि तितकाच सुरेल आवाज यांचा सुंदर मिलाफ या गीतात दिसून येतो.

नयनात दाटला भाव तुझा सारंगा
मी विसरून गेले आज मला श्रीरंगा
हा मुखडा कानावर पडताच गाणं रसिकांच्या मनाची पकड घेतं.
Vaishali Rajesh या युट्यूब चॅनलवर हे गीत आपणास पाहायला मिळेल. अल्पावधीतच या गाण्यास रसिकांची उत्तम दाद मिळत आहे.
या सुंदर गीताच्या निर्मितीसाठी मेहनत घेतलेल्या सर्व कलाकारांचं मनःपूर्वक कौतुक.
शब्दः व्यंकटेश कुलकर्णी
स्वर आणि संगीतः वैशाली राजेश
नायिका: स्वर्णिमा धोटे
संगीत संयोजनः वैभव पांडे
ध्वनिमुद्रणः स्वाती कुलकर्णी
दिग्दर्शन आणि व्हिडीओ रुपांतरः सायली गौतम – दत्ता कोळगे
विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन: अतुल दिवे.











