सरपंचांना सुचना

0
276

सरपंचाना करावे लागणार आता कोविडचे शंभर टक्के लसीकरण अन्यथा….

कोविडचे शंभर टक्के लसीकरण करा अन्यथा विकास कामांना मुकाल गटविकास अधिकारी यांची सरपंचाना सुचना..

निलंगा,-(प्रशांत साळुंके) या महिण्यात शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या गावांनाच विकासकामांना मंजूरी मिळणार आहे अन्यथा गावच्या विकास कामाना मुकाल अशा सुचना सरपंचाच्या बैठकीत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यानी दिल्या.यामुळे गावच्या सरपंचाना आता शंभर टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करावे लागणार आहे.

निलंगा तालुका कोविड लसीकरणात संपूर्ण जिल्ह्यात उदिष्टापेक्षा कमी असून शासनाने पुरवठा केलेल्या लस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात पडून आहेत यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यानी पुढाकार घेतला पाहिजे परंतू सध्या तसे चिञ दिसत नाही लसीकरण बाबत लोक उदाशीन दिसत आहेत. निलंगा तालुका भुगोलिक दृष्ट्या मोठा असून कोविडचा पहिला आणि दुसरा डोस यामध्ये खुप मोठी तफावत आहे.ही तफावत दूर करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत,यासंबंधी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यानी सहभाग घेतला तर लसीकरणाचे उदिष्ट वेळेत पूर्ण होणार आहे.या उदिष्टासाठी कोणत्या ग्रामपंचायतने दुर्लक्ष केली तर गावातील विकास कामाना मुकावे लागणार आहे अशा सुचना बैठकीत निलंग्याचे गटविकास अधिकारी यांनी दिल्या आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर सक्तीचे आदेश काढले असून पाच गावासाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. सरपंच ग्रामसेवक यांना गावात दंवडी देऊन व स्पीकर लावून जनजागृती करणे बंधनकारक राहणार आहे. या कोविड लसीकरण कवच कुंडल मोहिमेत आता लसीकरणासाठी सर्वस्तरातून जनजागृती व लसीकरण करून घेणे बंधनकारक असणार आहे.

आतापर्यंत तालुक्यात ४५ टक्के लसीकरण झाले आहे. तिसरी लाट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही यासाठी सतर्क रहाणे व लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे.या लसीकरण मोहिमेत दुसरा डोस २७ टक्के झाला असून राहिलेल्या पाञ नागरिकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष करू नये.लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी दिनांक ८ आक्टोबर पासून प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे सकाळी ९ ते सांयकाळी ८ वाजेपर्यंत लस चालू ठेवण्यात येणार आहे.

या मोहिमेसाठी नवराञ उत्सवातील मंडळ ,बचत गट नेहरू युवा केंद्र तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सुध्दा शंभर टक्के लसीकरण करण्यासंदर्भात मुख्याद्यापक व वर्गशिक्षक यानी तशा सुचना पालकांना विद्यार्थ्यांमार्फत केल्या पाहिजेत तसेच गावातील पदाधिकारी नवतरूण मंडळ यानी पुढाकार घ्यावा त्यांना लोकप्रतिनिधीने सहकार्य करावे आणि जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे.असे आव्हान गटविकास अधिकारी अमोल ताकभाते व तालुका आरोग्य अधिकारी प्रदिपकुमार जाधव यानी केले आहे.

प्रदिपकुमार,जाधव तालुका आरोग्य अधिकारी दिवसाला सहा हजार लस उपलब्ध होती परंतु लोकांचा सहभाग महत्त्वाचा दवंडी नवराञ मोहत्सव बचत गटांच्या महिलांना करावे लागणार आता लसीकरणासाठी काम दहा दिवसात लसीकरण कमी होत आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे शंभर टक्के लसीकरण करणे बंधनकारक असेल अक्का फाँडेशनला लसीकरणासाठी मोलाचे काम करावे लागेल पोलिस पाटील सरपंच ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here