काँग्रेस नेत्यांकडून ‘वंदे मातरम्’ चा अवमान, निषेधार्थ; भाजयुमोचे आंदोलन, गांधी चौकात सामूहिक गायन
लातूर दि.१६ – स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमा दरम्यान ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू असताना या राष्ट्रीय गीताचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवमान करण्याचा प्रयत्न झाला या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी आंदोलनासाठी काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरल्याने गांधी चौकातच निषेध आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ च्या १५० व्या वर्षानिमित्त राष्ट्रव्यापी कार्यक्रमांना मंजुरी दिली. स्वातंत्र्य लढ्यातील ‘वंदे मातरम्’ चे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, देशभक्तीची भावना दृढ करणे आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आणि राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याने संपूर्ण देशभर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणापूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायले. काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमा दरम्यान वंदे मातरम गायन सुरू असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून अवमान करण्याचा प्रयत्न झाला या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा कराड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यासाठी जात असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गांधी चौकातच अडविले. शांततामय आंदोलन करण्याचे ठरल्याने नाईलाजास्तव लातूर येथील गांधी चौकात भारत माता की जय, वंदे मातरम, सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा देऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना निषेध आंदोलन करावे लागले. सामूहिक वंदे मातरम गायनाने या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलना दरम्यान गांधी चौकात पोलिसाचा मोठा फौज फाटा होता.

या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे महेंद्र गोडभरले, प्रताप पाटील, दशरथ सरवदे, सुरज शिंदे, शरद दरेकर, विश्वास कावळे, अमरसिंह चव्हाण, पांडुरंग बलवाड, अशोक राठोड, राजेश काळे, ईश्वर घोडके, नरेश चपटे, महेश गाडे, प्रशांत पाटील, श्याम भोळे, वैभव मगर, रवींद्र नागरगोजे, बाळासाहेब कदम, उत्तम चव्हाण, महादेव गुरुशेट्टे, प्रदीप शिंदे, अजय राठोड, चंद्रकांत कातळे, शुभम खोसे, सचिन लटपटे, नारायण राठोड, बालाजी गवळी, धनराज शिंदे, दत्ता सप्ताळ, मुकुंद केसरे, प्रशांत रायनूळे, शहानुर बागवान, शालिक जाधव, सोमनाथ वाघमारे, अमृत पाटील, शुभम गांगले, रोहित चवळे, अशोक सावंत, गिरीश पाटील, सचिन कदम, विक्रम पाटील, मारुती शिंदे, संतोष तिवारी, रविकांत कुटवाड, अजय राऊत, ऋषिकेश पोतदार, गजानन बोकन, सुरजसिंह राजपूत, रमण लातूरे, गोविंद सूर्यवंशी, पांडुरंग बोडके, आदिल मुळे, गणेश कसबे, अभी खानापुरे, यश कोठारी, गजानन गंभीरे, सचिन गुट्टे, सोहम देवारे, विश्वजीत पवार, गजानन बोकन, रोहित गायकवाड, श्रीमंत नागरगोजे, हर्ष गिराम, सोमनाथ वाघमारे, संजय गुळबिले, विठ्ठल डोंगरे, संजय डोंगरे, माधव घुले, पवन खोबरे, सचिन कराड, विशाल मस्के, मुकुंद केसरे, मंगेश पाटील, बाळासाहेब म्हाले, गणेश पडुळे, किशोर काळे, महादेव नागापुरे, अच्युत भोसले, विश्वजीत पवार, सुरेश सूर्यवंशी, अशोक केंद्रे, ओम स्वामी, नितीन मुरकुटे, अंकुश देवकते, अर्जुन खंदाडे, ऋषी पोद्दार, पांडुरंग बोडके, बापू धवाने, राम भताने यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




