Homeराष्ट्रीयलातूर मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित एक्सप्रेस

लातूर मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित एक्सप्रेस

लातूर मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित एक्सप्रेस; प्रवाशांचा आर्थिक भार कमी होणार

लातूर : रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत मध्य रेल्वेने लातूर मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांना नियमित एक्सप्रेसचा दर्जा दिला आहे. हडपसर–हरंगूळ (लातूर) आणि सोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (वाया बीदर, लातूर) या दोन गाड्या आता विशेष गाडीऐवजी नियमित मेल/एक्सप्रेस दर्जाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना विशेष गाडीचे अतिरिक्त भाडे न भरता सामान्य एक्सप्रेस तिकीट दरात प्रवास करता येणार आहे.

हडपसर–हरंगूळ एक्सप्रेस १५ ऑगस्टपासूनहडपसर–हरंगूळ–हडपसर विशेष गाडीचे ०१४८७/०१४८८ हे क्रमांक बदलून आता अनुक्रमे ११४२९ हडपसर–हरंगूळ एक्सप्रेस आणि ११४३० हरंगूळ–हडपसर एक्सप्रेस असे करण्यात आले आहेत. या गाड्या १५ ऑगस्ट २०२६ पासून नियमित एक्सप्रेस दर्जाने धावतील.सोलापूर–मुंबई एक्सप्रेस १८ ऑगस्टपासूनसोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (वाया बीदर, लातूर) विशेष गाडीचे ०१४३५/०१४३६ हे क्रमांक बदलून आता ११३०३ सोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि ११३०४ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस–सोलापूर एक्सप्रेस असे करण्यात आले आहेत. ही साप्ताहिक एक्सप्रेस १८ ऑगस्ट २०२६ पासून सामान्य मेल/एक्सप्रेस दर्जाने धावणार आहे.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

या दोन्ही गाड्यांना विशेष दर्जा असल्याने प्रवाशांना नियमित गाड्यांच्या तुलनेत तिकिटासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता. हा अतिरिक्त भार कमी करून गाड्यांना नियमित एक्सप्रेसचा दर्जा देण्याची मागणी रेल्वे विभागाकडे सातत्याने करण्यात आली होती.विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी सोलापूर येथे झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही ही मागणी आग्रहीपणे मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने लातूर, धाराशिव, बार्शी, सोलापूर, पुणे आणि मुंबई परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.विशेष गाड्यांचा दर्जा काढून नियमित एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने तिकिटावरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होऊन प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. लातूरमार्गे नियमित रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

..आता प्रवाशांना एवढेच तिकीट दर मोजावे लागणारजनरल 125/-स्लीपर 230/-3 टायर 600/-Ac2 टायर 845/-Ac

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments