25.1 C
Pune
Sunday, May 3, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडीकिल्लारी येथे मोरारी बापूंची श्री राम कथा

किल्लारी येथे मोरारी बापूंची श्री राम कथा

श्री राम कथा ज्ञानयज्ञाच्या भव्य मंडपाचे

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे दि. २३ ते ३१ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रसंत प. पू. मोरारीबापू यांच्या श्री राम कथा ज्ञान यज्ञाच्या भव्य मंडपाचे श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात भूमिपूजन शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

ही कथा दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी दिड या वेळेत होणार आहे. कथेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सभा मंडपाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीरमणजी लाहोटी, ओमप्रकाश डागा , बियाणी, किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, माजी सरपंच डॉ. शंकर परसाळगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन सोहळ्यानंतर श्री राम कथा संयोजन समितीच्या वतीने आ. पवार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी श्री राम कथेच्या श्रवणासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. श्री राम कथेच्या श्रवणासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे. त्याकरिता आवश्यक तो पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.

माहेश्वरी समाजाच्या लातूर शहराध्यक्षपदी लक्ष्मीकांत सोनी यांची निवड झाल्याबद्दल यावेळी आ. पवार आणि डागा परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वरप्रसाद डागा यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कथेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विस्तृतपणे विशद केली. याप्रसंगी हुकूमचंदजी कलंत्री, राजेंद्र मालपाणी, दिनेश पपरूनिया, श्याम खटोड, शरद नावंदर, रमेश राठी, रामेश्वर सोमाणी, ईश्वर बाहेती, गोविंद धूत, श्याम धूत, विजय पस्तापुरे , हरीशभाई ठक्कर, रामबिलास लोया, हरिकिशन मालू, आनंद लाहोटी, बाळूसेठ बिदादा, दर्शन डागा , आकाश डागा, किरण झंवर, श्रीकांत बजाज, श्याम बांगड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]