30.8 C
Pune
Wednesday, June 10, 2026
Home क्रीडा *क्रीडा स्पर्धेत त्रिपुरा महाविद्यालयाचे यश*

*क्रीडा स्पर्धेत त्रिपुरा महाविद्यालयाचे यश*

0
412


जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्ध्येत श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे विविध स्पर्धेत घवघवीत यश  

क्रीडा व युवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ अंतर्गत सुरु असलेल्या  जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धामध्ये श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
कब्बडी स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील एकूण ३५ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व संघावर मात करीत श्री. त्रिपुरा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्याच बरोबर १९ वर्ष वयोगटातील एकूण ११ संघ सहभागी झाले होते, त्यातही सर्व संघावर मात करीत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
तायक्वांदो स्पर्धेत ४५ ते ४८ किलो वजनी गटामध्ये रितेश कुमदाळे बॉक्सिंग स्पर्धेत ५६ ते  ६० किलो वजनी गटामध्ये प्रशांत नागटिळक ५२ ते ५६ किलो वजनी गटामध्ये अमोघ वर्ष मोरे, ५४ ते ५७ किलो वजनी गटामध्ये मदने सुप्रिया या विद्यार्थ्यांने अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्ध्येस प्रशांत नागटिळक याने दुसरा क्रमांक पटकावला आणि कॅरम स्पर्ध्येत सिद्धांत कांबळे याने यश संपादन केले.
संस्थाध्यक्ष मा. श्री. उमाकांत होनराव, प्राचार्य तथा सचिव सौ. केवळराम सुलक्षणा, कार्यकारी संचालक मा. श्री. ओंकार होनराव, उप प्राचार्य श्री. केदासे राजकुमार, श्री. दिपक होनराव, श्रीकृष्ण जाधव, ज्ञानेश्वर पुरी यांनी क्रीडा प्रशिक्षक श्री. नितीन गंगापूरे, श्री. झुंजे महेश, दंडीमे कोंडीबा व सर्व विद्यार्थी स्पर्धक यांचे कौतुक केले आणी यापुढे ही दरवर्षी अशाच प्रयत्नातून प्रथम क्रमांक पटकावित यश संपादन करावे असा प्रेरणादायी संदेश  संस्थाध्यक्ष मा. श्री. उमाकांत होनराव यांनी दिला.
प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]