26.9 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home ठळक बातम्या गुरुपौर्णिमा उत्सव बातमी

गुरुपौर्णिमा उत्सव बातमी

0
337

हिरेमठ संस्थानचा गुरुपौर्णिमा उत्सव मर्यादीत स्वरूपात होणार 

विलास कुलकर्णी यांजकडून

औसा (प्रतिनिधी)दि.२०औसा येथील हिरेमठ संस्थांनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा गुरु पौर्णिमेचा उत्सव कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मर्यादित शिष्यगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. हिरेमठ संस्थांचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी मागील आठ दशकापासून आध्यात्मिक क्रांती केल्यामुळे हिरेमठ संस्थान बद्दल भाविकांच्या मनात नितांत आदर आहे. दरवर्षी हजारो भक्तगण गुरूपौर्णिमा उत्सवासाठी गुरूंच्या दर्शनासाठी हिरेमठ संस्थांनमध्ये येतात ष. ब्र.१०८डाॕ. श्री शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थांनचे पीठाधिपती 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली वार्षिक गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने मर्यादित भक्तगणांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून,सोशल डिस्टन्स ठेवून,साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक भक्त व शिष्यगणांनी आपापल्या घरी सुरक्षित राहून गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करावा असे आवाहन वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषअप्पा मुक्ता, प्रा युवराज हलकुडे, सिद्रामप्पा मिटकरी, राजाभाऊ नागराळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]