31.5 C
Pune
Sunday, October 4, 2026
Home ताज्या बातम्या डॉ.भागवत कराड यांचा सत्कार

डॉ.भागवत कराड यांचा सत्कार

0
296

*केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचा*

*लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार*

बीड….      गोपीनाथ गड येथून सुरू झालेल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गंगाखेड येथे येताच यात्रेच्या पहिल्या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने मंत्री कराड यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जन आशिर्वाद यात्रेचे गंगाखेड येथील आ रत्नाकर गुट्टे यांनी छोटेखानी कार्यक्रमात जोरदार स्वागत केले याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष माजी आमदार विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले व यात्रेला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]