30.4 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home ठळक बातम्या निधन वार्ता

निधन वार्ता

0
271

डाॅ. दिनकर काळे
यांना पितृशोक
लातूर /
येथील नामवंत सर्जन डाॅ. दिनकर काळे यांचे वडील आणि आयएमएच्या अध्यक्षा डाॅ. सुरेखा काळे यांचे श्वशुर व्यंकटराव सखाराम काळे ( 94 ) यांचे काल बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी सुगाव ( ता. चाकूर ) येथे करोनाविषयक नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुगावचे पाटील म्हणून ते लोकप्रिय होते. संपूर्ण आयुष्य शेतीसाठी वाहून घेतलेल्या व्यंकटरावांनीश आपल्या मुलांना व नातवांना मात्र उच्चशिक्षित केले. थोरले चिरंजीव डाॅ. दिनकर ( लातूर ) , धाकटे चिरंजीव ॲड. रामराव,
नोटरी ( चाकूर ) , नातू डाॅ. निखिल ( सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर ), एक नातू अमेरिकेत, तर आणखी एक नातू ऑस्ट्रेलियात आहेत. वारकरी असलेल्या व्यंकटरावांनी पंढरपूर व तेर येथील पंधरा दिवसांची वारी आपल्या हयातीत कधी चुकविली नाही. त्यांच्या पश्चात् तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, जामात असा मोठा परिवार आहे.
स्व. व्यंकटराव काळे यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी डाॅ. बसवराज वारद, डाॅ. ईरपतगिरे, डाॅ. हर्षवर्धन राऊत, डाॅ. एस.एन. जटाळ, डाॅ. हंसराज बाहेती, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, डी. एन. शेळके , पंडितराव धुमाळ डाॅ. मेघराज चावडा, डाॅ. विश्रांत भारती आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]