Homeआरोग्य वार्तापोद्दार हॉस्पिटलच्या अस्थिरोग शिबिरात ९८ रुग्णांची तपासणी व उपचार

पोद्दार हॉस्पिटलच्या अस्थिरोग शिबिरात ९८ रुग्णांची तपासणी व उपचार

दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त

पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित अस्थिरोग शिबिरात ९८ रुग्णांची तपासणी – उपचार

लातूर ;( माध्यम वृत्तसेवा): –दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अस्थिरोग शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ९८ रुग्णांची तपासणी – उपचार करण्यात आले.

या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, अभिजीत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर एड. स्नेहल उटगे, विलास बँकेचे चेअरमन एड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेविका खाजाबानू बुऱ्हाण, श्याम धूत, विजय पस्तापुरे , संजीव भार्गव, दीपक वारद , आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा पॅटर्न निर्माण करण्याचे काम करणाऱ्या डॉ.अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलच्या वतीने आजपर्यंत आयोजित करण्यात आलेले हे १७५ वे अस्थिरोग शिबीर होते, हे विशेष.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“default”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:2,”ai_enhance”:1,”transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

जे जे काही नवीन ते ते आपल्या लातूरला हवे या भावनेने लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरला सर्वांगसुंदर बनवण्याचा ध्यासच घेतला होता. प्रत्येक क्षेत्रात आपले लातूर अव्वल राहिले पाहिजे या हेतूने त्यांनी जवळपास सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक – उद्योजकांना कायम प्रोत्साहित करण्याचे काम केले होते. आज लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगतीमध्येही या दिवंगत लोकनेत्याच्या दूरदृष्टीचा सिंहाचा वाटा आहे, ही बाब कोणीही नाकारणार नाही.

आजच्या या उदघाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी डॉ. अशोक पोद्दार आणि आरोग्य शिबीर हे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी एक अतूट नाते बनल्याचे मत व्यक्त केले. दिवंगत लोकनेत्याच्या पुण्यतिथी – जयंतीदिनी ते नियमित अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करतात. रुग्णसेवेस प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील , तळागाळातील रुग्णांनाही अशा शिबिरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात,असेही खा. डॉ. काळगे यांनी सांगितले.

अभय साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लातूरकरांच्या आरोग्यासाठी लातूर शहरातील बहुतांश तज्ज्ञ डॉक्टर्स अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करतात. त्या सर्वामध्ये डॉ. अशोक पोद्दार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते हे सर्वांना माहितीच असल्याचे त्यांनी सांगितले. एड. किरण जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. अशोक पोद्दार अस्थिरोग शिबिराचा उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात, असे सांगून या शिबिराच्या माध्यमातून आपल्या लोकनेत्याला ते दरवर्षी अशा प्रकारच्या अस्थिरोग शिबिराच्या उपचाराच्या रूपाने भावपूर्ण आदरांजली वाहतात,असे सांगितले. पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी या शिबिराच्या निमित्ताने आपल्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले. आपल्या हॉस्पिटलच्या वतीने नियमित अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात येते, याबद्दल सर्वच मंडळी आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. पण, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गरजू रुग्णांनाही सेवा देण्याचे ईश्वरी कार्य साधले जाते हे आपल्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिराच्या निमित्ताने अस्थिरोग, फिजिओथेरपी, रक्त तपासणी, डिजिटल एक्सरे मध्ये ५० टक्के सूट देण्यात अली. शस्त्रक्रियेमध्ये ३० टक्के तर एमआरआय, सिटीस्कॅन मध्ये १० टक्के सूट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांना उपलब्धतेनुसार मोफत औषधींचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या शिबिरात एकूण ९८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हाडांची मोफत ठिसूळता तपासणी ७३ रुग्ण, एक्सरे ३६ रुग्ण तर २३ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. डॉ.अशोक पोद्दार यांच्यासह डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. कपिल धुमुरे, डॉ. सिद्रामप्पा भोसगे,डॉ. प्रशांत अंभोरे, यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह सर्व स्टाफने परिश्रम घेतले.

————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments