Homeसहकारभविष्यात मांजरा उसाला चांगला भाव देणार - दिलीपराव देशमुख

भविष्यात मांजरा उसाला चांगला भाव देणार – दिलीपराव देशमुख

*विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

कमी क्षेत्रात अधिक उत्पादन वाढीवर भर द्यावा*

*आगामी गाळप हंगामात ऊसाला अधिक भाव देऊ*

*माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख*

*विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

लातूर दि. १८ विकासरत्न विलासराव देशमुख व बब्रुवानजी काळे यांनी ४० वर्षापूर्वी लावलेल्या रोपटयाचे महावृक्षात रूपांतर झाले आहे. ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडत आहेत. शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुधारले पाहिजे. ते पाहत असताना मांजरा परिवाराने पहिले प्राधान्य शेतकरी, त्या व्यवस्थापनाचे कर्मचारी यांचे हित जोपासण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्यावे. गाळप झालेल्या ऊसाला ३ हजार १७७ रूपये रूपये प्रतिक्विटल बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे. त्यामुळे आगामी काळात गाळपास येणाऱ्या ऊसालाही अधिक भाव देऊ, असे प्रतिपादन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना केले .

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची २०२५-२६ ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रंसगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार तथा विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील लातूर जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, श्रीशैल्य उटगे, मारुती चे माजी चेअरमन गणपतराव बाजूळगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*जिल्हा बँक साखर कारखान्यामुळे लातूर पॅटर्नचे वेगळेपण*

हार्वेस्टर चालकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते यावर्षीच्या बरोबरच पुढच्या वर्षीचेही हप्ते बँकेला आदा केले आहेत. हि ताकद केवळ साखर कारखाने व जिल्हा बँकेमुळे निर्माण झाली आहे. साखर कारखाने, जिल्हा बँकेमुळे लातूर पॅटर्नचे वेगळेपण आपणाला पहायला मिळत आहे. केवळ साखर कारखाने आर्थिक व्यवस्थापनामळे नफयात असले तरी लातूर जिल्हयातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे, असे सांगून दिलीपराव देशमुख म्हणाले की, काम करत असताना कांही जन टिका करतात. त्यांना आपण आपल्या कामातून उत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले.कर्मचाऱ्यांना १० टक्के बोनस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस जाहिर करताच या निर्णयाचे टाळयाच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले

.*मांजरा’ साहेबांसाठी जीव की प्राण**साहेबांनी जे उभे केले ते दिलीपराव देशमुख साहेब यांनी पुढे नेण्याचे काम केले**माजी मंत्री आमदार अमित देशमुख*

लोकनेते विलासराव देशमुख यांनी चार दशकापूर्वी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. लोकनेते विलासराव देशमुख यांनी जे-जे उभे केले ते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुढे नेहण्याचे काम केले आहे. मांजरा साखर कारखाना लोकनेते विलासराव देशमुख यांच्यासाठी जीव की प्राण आहे. म्हणून आज मांजरा परिवारातील सर्वच कारखाने उत्तम रीतीने चालत आहेत. ज्या उद्देशाने मांजरा कारखान्याची उभारणी केली तो उद्देश साध्य करण्यासाठी या परिवारातील सर्वच साखर कारखाने अत्यंत शिस्तीत आणि काटेकोर नियोजनात वाटचाल करीत आहेत. हीच प्रेरणा घेऊन आज राज्यातील इतर अनेक कारखानेही या परिवारातील यशस्वी प्रयोगाचे आणि कारभाराचे अनुकरण करीत आहेत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची शतप्रतिशत १०० टक्के यांत्रीकीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. इथेनॉल, वीज, बायोगॅस, ऑक्सीजन, निर्मितीबरोबरच अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापरातून मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. साखर कारखानदारीतील जवळपास सर्व पुरस्कार आणि बक्षिसे या कारखान्यांनी मिळवली आहेत. आगामी काळातही याच पद्धतीचा उत्तम कारभार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून होत राहील, असे आमदार अमित देशमुख म्हणाले.

*५ वर्षात १० हजार तरूणांच्या हाताला काम**जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख*

लातूर जिल्हयात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी कर्ज माफीमुळे थोडा कर्ज वसूलीवर परिणाम झाला असला ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परत फेड केले आहे. अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत. आजचे युग हे तरूणांचे आहे. म्हणून मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी गेल्या ५ वर्षात १० हजार तरूणांच्या हाताला काम दिले आहे. हे सर्व चांगले व्यवस्थान असले तरच घडते. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्यामुळे वर्षाला २२ हजार कोटीची उलाढाल होत आहे. तर ५ वर्षात केंद्र शासनाला १०० कोटीचा इन्कमटॅक्स भरला आहे. मांजरा साखर कारखान्याची चार दशकापासून वाटचाल सुरू आहे. आपला शेतकरी ताट मानेने जगला पाहिजे, त्यासाठी सतत काम सुरू आहे. म्हणून लातूर जिल्हा मराठवाडयात अगे्रसर आहे. लातूर जिल्हयातील सहकार, शिक्षण चांगले चालतात ते दूरष्टीकोन असणाऱ्या नेतृत्वामुळे, असे जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख म्हणाले.यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे, जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले विलास साखर चे कार्यकारी संचालक श्री पवार श्री पाटील, रविशंकर बरमदे मिडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी मांजरा साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष अशोकराव काळे संचालक श्रीशैल् उटगे, कैलास पाटील तात्यासाहेब देशमुख वसंत उफाडे नवनाथ काळे धनराज दाताल सदाशिव कदम अनिल दरकसे मदन भिसे द्यानेश्वर पवार नीलकंठ बचाटे सचिन शिंदे दयानंद बिडवे भैरू कदम श्रीकृष्ण काळे सुरेश चव्हाण तक्रार निवारण समिती अध्यक्ष तानाजी जाधव कार्यकारी संचालक पंडित देसाई ऊस उत्पादक, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे यांनी केले सभेचे विषयांचे वाचन कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले सर्व विषयांना टाळ्या वाजवून सभासदांनी मान्यता दिली आभार प्रदर्शन संचालक कैलास पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments