25.8 C
Pune
Saturday, May 16, 2026
Home कला ‘ अभिजात’ च्या सौजन्याने निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात लघुपट महोत्सव

‘ अभिजात’ च्या सौजन्याने निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात लघुपट महोत्सव

0
530

सिने दिग्दर्शक आदित्य केळगावकर
यांच्या उपस्थितीत समारोप

लातूर ;दि.१३-(शाम जैन यांजकडून)


निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दि. 11 व 12 एप्रिल रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. हा महोत्सव महाविद्यालय, अभिजात फिल्म सोसायटी व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सौजन्याने झाला. दोन दिवसीय राज्यस्तरीय लघुपट महोत्सवाचे सोमवारी उद्घाटन झाले, दिवसभरात विद्यार्थ्यांनी अनेक लघुपट पाहून प्रसिद्ध सिने समीक्षक, फिल्म जुरिस्ट, आणि दिग्दर्शक मा. डॉ. संतोष पाठारे सर, मुंबई, अभिजात फिल्म सोसायटी, लातूर चे सचिव श्री. शाम जैन सर, उत्कृष्ट रंगकर्मी, आणि सिने अभ्यासक डॉ. संतोष कुलकर्णी सर यांच्या कडून लघुपट समजून घेतले आणि भरपूर प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.


दुसऱ्या दिवशीही तीन सत्रात लघुपट दाखविण्यात आले व त्यावर चर्चा झाली. यापैकी एक सत्र अभिजात चे उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील देशमुख यांनी घेतले. विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर सिने दिग्दर्शक आदित्य केळगावकर यांच्या उपस्थितीत त्यांचा ‘साऊंडप्रूफ’ हा लघूपट दाखविण्यात आला. नंतरच्या समारोपाला आदित्य केळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगत त्यांच्याशी संवाद साधला.


नंतर सायंकाळी लघुपट महोत्सवाची सांगता उपप्राचार्य डॉ सी. जे. कदम सर, उपप्राचार्य प्रा. पी. पी. गायकवाड, दिग्दर्शक श्री. आदित्य केळगावकर, डॉ. स्वप्नील देशमुख, श्री. शाम जैन, श्री अभिजित भूमकर, डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. जी. जी. शिवशेट्टे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.
अभिजात चे सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर चौधरी (ते या महाविद्यालयात इंग्रजी चे प्राध्यापक आहेत) यांचे नेटके नियोजन, त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले प्रयत्न व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद यामुळे हा महोत्सव आगळावेगळा ठरला.
एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच शिवाय विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले मनोगत अधिक भारावून टाकणारे होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]