28.6 C
Pune
Thursday, May 14, 2026
Home ठळक बातम्या आमदार निलंगेकर यांची टीका

आमदार निलंगेकर यांची टीका

0
509

महाविकास आघाडीचे सरकार नव्हे, तर बांद्रा-बारामतीचे सरकार — आ.संभाजीराव पाटील निलंगेकर 

शिरूरअनंतपाळ,-( प्रशांत साळुंके )- शेतकरी आणि मराठवाडा विरोधी असलेले राज्यातील महाविकास आघाडी शासन प्रत्यक्षात बांद्रा-बारामती महाविकास आघाडी सरकार असल्याची टीका माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी केली.शिरूरअनंतपाळ तालुक्यातील डिघोळ,साकोळ,सुमठाणा येथील विकास कामे व अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा लोकार्पण समारंभ झाला.

याप्रसंगी राज्य सरकारवर टीका करताना माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की,शरद पवार आणि मुख्यमंञी उध्दव ठाकरे हे दोन्ही नेते केवळ आपापल्या भागाचा विकास करून घेण्यात मश्गुल आहेत.सलग दुसर्‍या वर्षी राज्यातील शेतकरी संकटात आहे.पण,सरकारकडून मदत केली जात नाही.गतवर्षी अतिवृृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई दिली नाही.यंदा मराठवाड्यातील अडीचशेहून अधिक मंडळात अतिवृृष्टी झाली.त्यालाही मदत नाही.पीकविमा मिळत नाही.राज्याच्या विविध भागांच्या विकासासाठी सरकार मदत देत असते.पण,मराठवाड्याच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत.नुकसानाची पाहणी करताना हेक्टरी ५० हजार रूपये मदतीची घोषणा करणार्‍या सरकारने पीक विमाही दिलेली नाही,असेही ते म्हणाले.

याप्रसंगी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,कृृृृषी सभापती गोविंदराव चिलकुरे,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,माजी उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रामचंद्र तिरूके,जि.प.सदस्य तथा संघटन सरचिटणीस संजय दोरवे,शिरूरअनंतपाळ पंचायत समितीचे सभापती डाॅ.नरेश चलमले,शिरूरअनंतपाळचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,माजी आमदार रामभाऊ गुंडिले,प्रदेश कार्यकारणी सदस्य जयश्री पाटील,पंचायत समिती सदस्य वर्षा भिक्का,चेअरमन दगडू सोळुंके,माजी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश बिराजदार,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले,माजी सभापती बापुसाहेब राठोड,नागेश चलमले,संतोष डोंगरे,बालाजी साळुंके आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]