आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून उघडले
खाजगी फायनान्स कंपनीने घराला केलेले सिल
आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून उघडले
लातूर तालुक्यातील मौजे ममदापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याला दिलासा
लातूर दि. १७ – खाजगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरले नाहीत म्हणून लातूर तालुक्यातील मौजे ममदापूर येथील अल्पभूधारक शेतकरी नवनाथ बोयणे यांच्या घराला लावलेले सील लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी संबंधितांशी चर्चा करून आज मंगळवारी सकाळी लावलेले सील काढून बोयणे यांना त्यांचे हक्काचे घर ताब्यात देण्यात आले.

दुष्काळाच्या काळात कोणत्याही वित्तीय संस्थांनी वसुलीसाठी तगादा करू नये दबाव टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश असल्याचे आ. कराड यांनी यावेळी बोलून दाखविले. लातूर तालुक्यातील मौजे ममदापूर येथील अल्पभूधारक शेतकरी नवनाथ नरसिग बोयणे यांनी चार वर्षांपूर्वी अडीच लक्ष रुपये एक्विटास या खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. आठ दहा हप्त्याची परतफेड केली मात्र उर्वरित हप्ते नैसर्गिक संकटामुळे फेडता आले नाहीत. सदरील कंपनीने नोटीसा देऊन न्यायालयाच्या आदेशानुसार बोयणे यांच्या घरास सात आठ महिन्यापूर्वी सील ठोकले होते. सदरची माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळताच आ. रमेशआप्पा कराड यांनी संबंधित मंत्री महोदयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असता प्रशासनाने तातडीने दखल घेतली. सदरील खाजगी फायनान्स कंपनीच्या संबंधीतांशी चर्चा केली.

मौजे ममदापूर येथे आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत १७ नोव्हेंबर मंगळवार आज रोजी सकाळी फायनान्स कंपनीच्या संबंधितांनी घराचे सील उघडून नवनाथ बोयणे यांच्या कुटुंबीयांना घर खुले करून दिले. संकटाच्या काळात आ. कराड यांच्या प्रयत्नामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की, कर्ज पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांना दुष्काळाच्या काळात वसुली करू नये अथवा तगादा लावू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शासनाचे सक्त आदेश आहेत. बोयणे यांचे प्रकरण सात आठ महिन्यापूर्वीचे आहे. दुष्काळाच्या या काळात कोणत्याही कर्जदाराला पतपुरवठा करणाऱ्या कोणत्याही संस्थेकडून त्रास झालेला नाही. जर वसुलीसाठी कोणी दबाव टाकला, तगादा लावला तर त्यांनी संबंधित प्रशासनाला कळवावे असे बोलून दाखविले.

घराला सिल ठोकल्याने आम्ही रस्त्यावर आलो होतो, मात्र आमदार साहेबांमुळे आम्हाला आमचे हक्काचे घर ताब्यात मिळाले असल्याची भावना नवनाथ नरसिंग बोयणे यांनी व्यक्त केली तर दुष्काळाच्या काळात शासन आणि प्रशासन शेतकरी शेतमजूर जनतेसोबत आहे असे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी बोलून दाखविले.

याप्रसंगी नवनाथ बोयणे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यासह किसान आघाडीचे विक्रमकाका शिंदे, जिप सदस्य महादेव साळुंखे, प्रताप पाटील, पांडुरंग बालवाड, गोविंद नरहरे, विजयकुमार मलवाडे, संजय ठाकूर, हनुमंत गव्हाणे, सुरेश पाटील, चंद्रकांत पासमे, आदिनाथ मुळे, रुपेश थोरमोटे, सतीश बिराजदार, सूर्यकांत शेळके, संजय सावंत, पद्माकर शिंदे, ज्ञानोबा शेळके, मारुती शिंदे, पुंडलिक बेंबडे, दत्तू वंगवाड, बालाजी पासमे, लिंबराज बोळंगे, मंडल अधिकारी दिलीप देवकते तलाठी अनुराधा पन्हाळे यांच्यासह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




