Homeउद्योगमराठवाड्यातील पहिल्या होमलेन सेंटरचा शुभारंभ

मराठवाड्यातील पहिल्या होमलेन सेंटरचा शुभारंभ

मराठवाड्यातील पहिल्या होमलेन सेंटरचा शुभारंभ

लातूरमधील पहिल्या एक्स्पिरियन्स सेंटरच्या सुरूवातीसह होमलेनचा क्षेत्रीय विस्तार

~ नवीन एक्स्पिरियन्स सेंटरमुळे लातूर, महाराष्ट्रमधील घर मालकांना आता सुव्यवस्थापित, डिझाइन-केंद्रित आणि एआय-सक्षम होम इंटिरीअरच्या सुविधा उपलब्ध होणार

~लातूर ( माध्यम वृत्तसेवा ):-मराठवाड्यातील पहिल्या होमलेन सेंटरचे लातूरमध्ये शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. लातूरकरांसाठी ही खास बाब म्हणावी लागेल.” जे जे नव ते लातूरला हवं” या उक्तीप्रमाणे हे लातूरला सुरू होणारे सेंटर लातूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. या सेंटरच्या उद्घाटनाच्या प्रसंगी होमलेनच्या असोसिएट उपाध्यक्षा सौम्या सिंहा रॉय प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फित कापून या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

लातूर, महाराष्ट्र, 23 ऑक्टोबर 2026: भारतातील आघाडीची तंत्रज्ञान आणि एआय-सक्षम होम इंटिरिअर्सच्या सेवा देणारा ब्रॅन्ड होमलेनने लातूर बाजारपेठेत प्रवेश करत प्रगती नगर येथे आपले पहिले एक्स्पिरियन्स सेंटर सुरू केले आहे. शहरातील निवासी प्रकल्पांच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर घरमालकांतर्फे वाढती मागणी लक्षात घेऊन हे सेंटर सुरू करण्यात आले असून डिझाइन-केंद्रित इंटिरिअर्स, पारदर्शक किंमती आणि एंड-टू-एंड सेवा आता लातूरमधील ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचणार आहेत.

517 चौरस फूट क्षेत्रफळ व्यापलेला हा लातूर स्टुडिओ ग्राहकांना संपूर्ण आणि अनुभवसमृद्ध एंड टू एंड इंटिरिअर डिझाइनचा प्रवास उपलब्ध करून देतो. येथे ग्राहक मॉड्युलर किचन, वॉर्डरोब्स तसेच संपूर्ण घरासाठीची इंटिरिअर सोल्यूशन्स हायपर-रिअलिस्टिक डिस्प्लेजच्या माध्यमातून पाहू शकतात, प्रीमियम दर्जाच्या मटेरिअल्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याबरोबरच, तंत्रज्ञानावर आधारित सल्लामसलतीद्वारे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच आपल्या स्वप्नातील घराची कल्पना साकार स्वरूपात पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

संपूर्ण इंटिरिअर डिझाइन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा एका छताखाली आणत यात संकल्पनेपासून पूर्णत्वापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.लातूरमधील हे एक्स्पिरियन्स सेंटर योगेश विनायक बोळेगावे यांच्यासोबत भागीदारीमध्ये सुरू करण्यात आले असून होमलेनच्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीला स्थानिक बाजारपेठेतील अनुभवाची जोड मिळाल्याने ग्राहकांना अधिक परिणामकारक आणि व्यावसायिक सेवा मिळणार आहे.लातूरमधील या नवीन स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या प्रमुख विकासक्षम बाजारपेठांमध्ये अधिक मजबूत उपस्थिती निर्माण करण्याच्या धोरणाला होमलेन बळकटी देत आहे.

आपल्या एफओएफओ (FOFO – Franchise-Owned, Franchise-Operated) मॉडेलच्या आधारे ह्या ब्रॅन्डने प्रमुख क्षेत्रीय बाजारपेठांमध्ये आपल्या पाऊलखुणा सातत्याने विस्तारल्या असून यावर्षी देशभरात 100 एफओएफओ स्टुडिओज् सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.या सेंटरच्या उद्घाटनाच्या प्रसंगी होमलेनच्या असोसिएट उपाध्यक्षा सौम्या सिंहा रॉय प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फित कापण्याच्या सोहळ्यामध्ये त्यांच्यासोबत होमलेनचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख व्यावसायिक भागीदारही उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी बोलताना होमलेनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) तनुज चौधरी म्हणाले, “महाराष्ट्रभरातील अधिकाधिक घरमालकांपर्यंत होमलेनच्या डिझाइन-केंद्रित आणि तंत्रज्ञान-सक्षम इंटिरिअर्स सेवा पोहोचवण्यासाठी लातूरमधील विस्तार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन घरांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी विश्वासार्ह भागीदाराची गरज असते. हे नवीन एक्स्पिरियन्स सेंटर पारदर्शक किंमती आणि प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या हमीसोबत आमचे डिझाइन कौशल्य आणि सर्वसमावेशक सेवा घरमालकांच्या अधिक निकट आणेल.”

होमलेनचे भागीदार योगेश विनायक बोलेगावे म्हणाले, “लातूरमध्ये होमलेनचे पहिले एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करणे ही कुटुंबांच्या होम इंटिरिअर्सकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची एक उत्तम संधी आहे. शहरात नव्या निवासी प्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने घरमालकांना दर्जेदार मटेरियल, शिस्तबद्ध कार्यान्वयन प्रक्रिया आणि विक्रीनंतरच्या सेवांची हमी देणाऱ्या विश्वासार्ह भागीदाराची गरज आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या बजेट आणि वेळेचा आदर राखत तंत्रज्ञानावर आधारित तसेच वैयक्तिक गरजांनुसार साकारलेला डिझाइन अनुभव देण्यास उत्सुक आहोत.”हे लातूर सेंटर होमलेनच्या मालकीच्या स्पेसक्राफ्ट या एआय-सक्षम प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना त्यांच्या घराचे इंटिरिअर 3डी स्वरूपात पाहता येते, तत्काळ किंमतीचा अंदाज मिळतो आणि डिझाइनपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होतो. याशिवाय ग्राहकांना पारदर्शक किंमती, निश्चित वेळापत्रक, 45 दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याची हमी, मटेरियलवर 10 वर्षांची वॉरंटी आणि संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाची सुविधा मिळते.

होमलेनबद्दल माहिती

2014 मध्ये प्रस्थापित करण्यात आलेला होमलेन हा आज भारतातील आघाडीची तंत्रज्ञान आणि एआय-सक्षम होम इंटिरिअर्स ब्रॅन्ड बनला आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक पद्धतीने एंड-टू-एंड इंटिरिअर सेवा देण्यावर यांचा भर आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहक समाधानाला प्राधान्य देत होमलेनने देशातील 51 शहरांमधील 83 एक्स्पिरियन्स सेंटर्सच्या माध्यमातून 55,000 हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. कंपनीला एक्सेल, पीक XV, वेस्टब्रीज, पीडीलाईट आणि एमएस धोनी यांसारख्या प्रतिष्ठित गुंतवणूकदारांचा पाठिंबा लाभला आहे.आम्हांला भेट द्या:होमलेन लातूर, एलआयसी कॉलनी, प्रगती नगर, लातूर, महाराष्ट्र – 413531.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments