पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त ५ मे २०२६ रोजी लोदगा येथे “होरेपळलेल्या नव्या युगाची सुरुवात –
शाश्वत भविष्यासाठी बांबू व पर्यावरणपूरक उपायांवर कार्यशाळा”
लातूर | दि. ४ मे २०२६पाशा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स फाउंडेशन, लोदगा यांच्या वतीने ५ मे २०२६ रोजी लोदगा येथे “होरेपळलेल्या नव्या युगाची सुरुवात – शाश्वत भविष्यासाठी बांबू व पर्यावरणपूरक उपायांवर कार्यशाळा चे आयोजन करून हवामान बदल, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास या विषयांवर मंथन होणार आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अन्तिनियो गुटेरस यांनी सुचविल्याप्रमाणे “तापमानवाढीचे युग संपले असून, होरेपळलेल्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे” या मुख्य विषयावर आधारित ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.अलिकडील काळात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ४० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी उष्माघातामुळे मृत्यूंच्या घटना वारंवार घडत असून विविध ठिकाणी आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, ही परिस्थिती मानवजातीसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शाश्वत व प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.या कार्यशाळेत बांबू या पर्यावरणपूरक व वेगाने वाढणाऱ्या संसाधनाचा वापर, हरित अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास व पर्यावरण संवर्धन यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.या प्रसंगी मा. श्री. पाशा पटेल (अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग, महाराष्ट्र) हे प्रमुख उपस्थित राहणार असून ते कृषी धोरणे व शेतकरी हिताविषयी मार्गदर्शन करतील.

श्री. सुनील जोशी (चेअरमन, वेध इंडिया, नागपूर) हे पर्यावरणपूरक प्रकल्पांवर मार्गदर्शन करतील. श्री. गणेश वर्मा (कार्यकारी संचालक, भव्यसृष्टी उद्योग, रायपूर) हे हरित तंत्रज्ञानावर भाष्य करतील.तसेच श्री. महादेव चीक्कना (संस्थापक, Mynusco, बेंगळुरू), श्री. दिलीप शर्मा (संचालक, नोव्हेल एंटरप्रायझेस लिमिटेड, मुंबई), श्री. राहुल देशमुख (अध्यक्ष, भारत लँड असोसिएशन, अमरावती) तुकाराम कंदाकुरे संचालक धनंजय ग्रुप छ. संभाजीनगर आणि आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ श्री. संजीव कर्पे (संचालक, KONBAC, सिंधुदुर्ग) हे विविध विषयांवर आपले मार्गदर्शन करतील.ही कार्यशाळा मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता फिनिक्स फाउंडेशन परिसर, लोदगा, जि. लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे.पर्यावरणप्रेमी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन शाश्वत भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. परवेज पाशा पटेल समन्वयक, फिनिक्स फाउंडेशन, लोदगा, जि. लातूर यांनी केले आहे.





