30 C
Pune
Thursday, October 1, 2026
Home महाराष्ट्र *सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे श्री क्षेत्र सराला बेट येथे उत्साहात स्वागत*

*सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे श्री क्षेत्र सराला बेट येथे उत्साहात स्वागत*

0
175

सद्गुरू गंगागिरी जी महाराज यांच्या समाधीचे घेतले दर्शन

श्रीरामपूर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचा मराठवाड्यात प्रवास सुरू आहे. आज त्यांच्या प्रवासाचा चौथा दिवस असून आज व उद्या ते श्री क्षेत्र बेट सराला या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत. श्री क्षेत्र बेट सराला येथे सकाळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी पू. संत गंगागिरी जी महाराजांच्या समाधीचे दर्शन त्यांनी घेतले. पू. संत रामगिरी जी महाराजांनी त्यांना तीर्थक्षेत्राची माहिती सांगितली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते तुळशीचे रोपण करण्यात आले. तसेच 150 वर्षापासून सुरू असलेल्या गोशाळेतील गोमाता कालवड चे पूजन करण्यात आले. या ठिकाणी 200 वर्षाची अखंड परंपरा असलेल्या पवित्र वीणा त्यांनी धारण केली. तसेच पूज्य संतासोबत त्यांचा वार्तालाप झाला. उद्या रा. स्व. संघ अंतर्गत ग्रामविकास गतिविधीच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत.

========

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]