26.5 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeशैक्षणिक*युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आस्था संकुल तत्पर - नितीन शेटे*

*युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आस्था संकुल तत्पर – नितीन शेटे*

लातूर/प्रतिनिधी:युवकांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत.या प्रयत्नात मदत करण्यासाठी आस्था केशवराज शैक्षणिक संकुल सदैव तत्पर आहे,असे प्रतिपादन आस्था- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबाजोगाई, संयोजक नितीन शेटे यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित आस्था केशवराज शैक्षणिक संकुलात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आस्था कुशल युवा पुरस्कार २०२२ चे वितरण शुक्रवारी (दि.१५ जुलै )करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नितीन शेटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्रचे उपाध्यक्ष जितेश चापसी तर प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जनता बँकेचे संचालक विनोद कुचेरिया यांची उपस्थिती होती.केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष मनोज शिरुरे,संस्था सदस्य संजय गुरव, ठाणे जनता सहकारी बँकेचे प्रबंधक श्रीनिवास जोशी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.


यावेळी मार्गदर्शन करताना नितीन शेटे म्हणाले की, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारे आस्था संकुल हे एक नामवंत केंद्र आहे.आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.जे युवक उद्योग-व्यवसायासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना मदत करण्यासाठी आस्था संकुल सदैव तत्पर आहे,असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात कला क्षेत्रातून कल्याण वाघमारे,कृषी क्षेत्रातून अभिनव भोसले,कौशल्य क्षेत्रातून सौ.ज्योतीताई मार्कंडे,तंत्रज्ञान क्षेत्रासाठी राजू रेड्डी व आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी डॉ.सागर रसाळ यांचा गौरव करण्यात आला.प्रशिक्षण पूर्ण करून विविध व्यावसायिक क्षेत्रात उतरलेल्या ५२ प्रशिक्षणार्थ्यांना आस्था कुशल युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


संस्था उपाध्यक्ष जितेश चापसी यांनी अध्यक्षीय समारोप केला. आस्था केशवराज संकुलाचे केंद्रप्रमुख उमेश गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आस्था संकुलाचे संचालक विवेक शिरसीकर, जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड,प्रकल्प समन्वयक अनिल गायकवाड,आदर्श गिरी, सुकेश सोनकांबळे,सुयोग जोगदंड,केशवराज विज्ञान महाविद्यालयाच्या विभागप्रमुख सौ.मनीषाताई टोपरे यांच्यासह संकुलातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]