Homeसहकारनिळकंठेश्वर कारखान्याचा पहिला हप्ता ३,१५० रुपये !

निळकंठेश्वर कारखान्याचा पहिला हप्ता ३,१५० रुपये !

निळकंठेश्वर कारखान्याचा पहिला हप्ता ३,१५० रुपये !

आमदार अभिमन्यू पवार यांची घोषणा, दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

शनिवार पासून श्री निळकंठेश्वर कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊसगाळपाला झाली सुरुवात

औसा : औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या गाळप हंगामातील पहिला ऊसहप्ता प्रतिटन ३ हजार १५० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. भीषण पाणीटंचाई आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.शनिवारी श्री निळकंठेश्वर कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊसगाळपाला सुरुवात झाली.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांतून श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामासाठी सज्ज झाला असून, शनिवारी प्रत्यक्ष ऊसगाळपाला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष गाळप सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.यंदा पावसाअभावी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, अशा परिस्थितीत ऊस हे नगदी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. त्यामुळे कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा निर्णय आमदार पवार यांनी घेतला. त्याचबरोबर प्रतिटन ३,१५० रुपयांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केल्याने ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दुष्काळी परिस्थितीत कारखान्याच्या कामकाजासाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेऊन कारखान्याने जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी अन्य स्रोतांचेही नियोजन करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात गाळप हंगाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे मानले जात आहे. दुष्काळामुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले असताना कारखान्याचे सुरू झालेले गाळप आणि प्रतिटन ३,१५० रुपयांच्या पहिल्या हप्त्याची घोषणा यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करण्यासोबतच शेतकऱ्यांना चांगला दर देण्याच्या भूमिकेमुळे आमदार अभिमन्यू पवार यांचा निर्णय ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments