Homeराजकीय*पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चेत आ.निलंगेकरांनी नोंदवला सहभाग*

*पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चेत आ.निलंगेकरांनी नोंदवला सहभाग*

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर परिक्षा पे चर्चेत सहभागी
लातूर/प्रतिनिधी ः– येणारा काळ विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसमवेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लातूर येथील राजस्थान विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या परिक्षा पे चर्चा या ऑनलाईन कार्यक्रमात माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सहभागी झाले होते.
राजस्थान विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या परिक्षा पे चर्चेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजप प्रादेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, महिला अध्यक्षा मिना भोसले यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या चर्चेत पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना असलेला परिक्षेचा ताण हलका केला आहे. त्याचबरेाबर विद्यार्थ्यांनी परिक्षाला कशा प्रकारे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन करून विशेष सुचनाही केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments