22.9 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeउद्योग*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनवर अभियंता गीता ठोंबरे यांची नियुक्ती*

*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनवर अभियंता गीता ठोंबरे यांची नियुक्ती*

अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा.

लातूर; ( माध्यम वृत्तसेवा)
राज्य पातळीवर सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करणारी एकमेव शिखर संस्था असलेली, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनवर अर्थवर्धिनी ” जानाई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लातूरच्या अध्यक्षा व लातूर महानगर सहकार भारतीच्या अध्यक्षा अभियंता सौ गीताताई ठोंबरे यांची ” निमंत्रित सदस्य” म्हणून ” नियुक्ती करण्यात आली आहे. हा अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेच्या कार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.

येथील उच्चशिक्षित महिलांनी एकत्र येत अभि.गीता ठोंबरे यांच्या नेतृत्वात अर्थवर्धिनी महिला पतसंस्थेची वर्षे २०१५ ला स्थापना केली. आठ वर्षात लातूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरत २२.३ कोटी ठेवी, १८.४ कोटी कर्जे, आठ वर्षे नफ्यात राहुन ऑडीट अ वर्ग प्राप्त केलेला आहे. मागील ७ वर्षात सभासदांना पतसंस्थेने १०% लाभांशाचे वितरीत केलेला आहे.

महिलांनी एकत्र येत लातूरच्या अर्थिक क्षेत्रात नेत्रदिपक कार्य उभे केले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने अभि गीता ठोंबरे यांची” निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्ती केली आहे.या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, उपाध्यक्ष डाॅ.शांतीलाल सिंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे,सहकार भारतीचे शरयुताई हेबाळकर, विजयराव देशमुख, संभाजी राचुरे, यांनीअभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]