दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प

0
502

रोटरी क्लब ऑफ चाकूर च्या वतीने दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
———————————————————–
लातूर : चाकूर तालुक्यातील हणमंत जवळगा येथे रोटरी क्लब ऑफ चाकूर च्या वतीने वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गुरुवार (दि.१) रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी वृक्ष लागवडीसाठी व संवर्धनासाठी तालुक्यातील डोंगराळ भाग दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येणाऱ्या काळात चाकूर तालुक्यामध्ये रोटरी क्लब ऑफ चाकूर च्या वतीने दहा हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार असून विविध घटकांनी यापूर्वी लागवड केलेली एक लाख झाडे संवर्धन करून जगवण्याचा संकल्प क्लब चे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी व सचिव संगमेश्वर जनगावे यांनी केला आहे. यावेळी रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर चाकूरकर, शैलेश पाटील, अमोल सुर्यवंशी, सचिन तेलंगे, शिवकांता पांचाळ, मेहराजबी शेख, गणपत हाळे, सविता जाधव, अश्विनी भोसले, दत्ता साळुंके आदींची उपस्थिती होती.

———————
फोटो ओळी
हणमंत जवळगा : रोटरी क्लब च्या वतीने वृक्ष लागवड करताना संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर चाकूरकर यावेळी शिवदर्शन स्वामी, संगमेश्वर जनगावे, शैलेश पाटील, अमोल सुर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here