धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राची अंमलबजावणी करा – सकल धनगर समाजाची मागणी
औसा/प्रतिनिधी –भारतीय घटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यापासून वंचित आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू होते. हे उपोषण सुरू असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारचे प्रतिनिधी उपोषण स्थळी येऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्यासह अशासकीय सदस्यांची समिती नेमून ५० दिवसात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची आश्वासन दिले होते.
राज्यसरकारने धनगर समाजाच्या उपोषणकर्त्या नेत्यांना दिलेले आश्वासनाचा कालावधी पूर्ण झाला असून अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली नाही. तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा सकल धनगर समाज तीव्र आंदोलन करील या मागणीसाठी सकल धनगर समाज औसा तालुका यांच्या वतीने तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी औसा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हार आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन निवेदन सादर केले. या निवेदनावर सर्वश्री राम कांबळे, सुधाकर लोकरे, उद्धव काळे, मुरलीधर सोनटक्के, कृष्णा सुरवसे, प्रशांत काळे, महादेव कांबळे, अखिलेश काळे, संभाजी सुरवसे, प्रशांत कांबळे, प्रदीप कांबळे, तेजस कांबळे, बळीराम सुरवसे, विशाल रायभोगे, राम घोडके, गणेश रायभोगे, महादेव सुरवसे, भरत शेडंगे, ज्ञानेश्वर घायाळ, दिपक काळे, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर जोगदंड, रवी सुरवसे, मच्छिंद्र चेंडके, महादेव कात्रे, सुखदेव सुरवसे, महादेव काळे, गोंवीद कारे, किरण डपाळ, किरण कांबळे, विकास लांडगे, शिवाजी काळे, तानाजी होळकर, कृष्णा कळबंडे, अर्जुन कळबंडे, आत्माराम मिरकले, आर. एस. सुरवसे, अशोक सुरवसे, वैभव कोरे, भागवत गायकवाड, आकाश बनसोडे, औदुंबर दुधभाते, रवी घोडके, दिपक बंडगर, अजय शेळके आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.





