26.2 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home ठळक बातम्या दिलीपराव – अशोकराव सदिच्छा भेट

दिलीपराव – अशोकराव सदिच्छा भेट

0
556

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची ; प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांची ‘ आशियाना ‘ वर सदिच्छा भेट 

निलंगा,—(प्रशांत साळुंके)—काँग्रस पक्षाचे माजीमंञी तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्याचे कैवारी तथा प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी लातूरस्थित ‘ आशियाना ‘ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे.

सदिच्छा भेटीदरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कष्ट देशपातळीवरील बँको ब्ल्यू रिबन हा पुरस्कार मिळाल्याने माजीमंञी तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी यथोचित पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची समजते.

काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यानिवडीबद्दलही माजीमंञी तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण बोधले ,उपसभापती बरगे सावकार, सचिन दाताळ , सिराज देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]