‘लातूर वृत्त प्रवाह’ साप्ताहिकाची दमदार एन्ट्री; प्रकाशन सोहळा थाटात संपन्न संपादक नेताजी जाधव यांच्या प्रिंट मीडियातील पदार्पणाचे स्वागत; पत्रकारांचा स्नेहमेळावा
लातूर | प्रतिनिधी: अल्पावधित लोकप्रिय झालेल्या ‘लातूर नेता’ वेब पोर्टल आणि ‘एलटीएन न्यूज’ चॅनलचे संपादक नेताजी जाधव यांनी आता साप्ताहिक ‘लातूर वृत्त प्रवाह’ सुरू करून प्रिंट मीडियामध्ये दमदार पाऊल टाकले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी दिनांक २६ जून रोजी येथील हॉटेल कनैयाच्या सभागृहात आयोजित शानदार कार्यक्रमात या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. बालाजी कुटवाडे होते, तर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांच्या हस्ते साप्ताहिकाचे प्रकाशन झाले. यावेळी अखील भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, ज्येष्ठ पत्रकार व मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर, रघुनाथ बनसोडे, शशिकांत पाटील, महेंद्र जोंधळे आणि प्रा. यू. डी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या प्रास्ताविकात संपादक नेताजी जाधव म्हणाले की, डिजिटल आणि प्रिंट मीडियानंतर आता वर्षभरात ‘लातूर एफएम’ सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि व्यवस्था परिवर्तनाचे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मुद्रित माध्यमाच्या आव्हानांवर भाष्य केले. सध्या सरकारकडून लादली जाणारी जाचक नियमावली आणि प्रिंट मीडियासमोरील अडचणींविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकार नितीन भाले यांनी पत्रकारांच्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. या प्रकाशन सोहळ्याचे रूपांतर एका प्रकारे पत्रकार स्नेहमेळाव्यात झाले होते. सुशील सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर लिंबराज पन्हाळकर यांनी आभार मानले.

या सोहळ्यास महादुभाऊ रसाळ, गणपत राठोड, के. वाय. पटवेकर, नितीन भाले, सर्फराज सय्यद, बंटीभैय्या गायकवाड, दत्ता परळकर, लहु शिंदे, राम जाधव, चंद्रकांत सुर्यवंशी, महादेव डोंबे, शिवाजी कांबळे, सुधाकर फुले, हमीद शेख, विष्णू आष्टीकर, प्रकाश कंकाळ, दिनेश गिरी, रवी बिजलवाड, डी. एल. वाघमारे, अहिल्या कसपटे, राम रोडगे, संतोष सोनवणे, शरद पवार, नितीन बनसोडे, सुनील गवळी, धनराज वाघमारे, विजय कवाळे, आरुण हांडे, संदिप भोसले, सुनिल कांबळे, अमोल घायाळ, श्रीकांत चलवाड, अजय घोडके, शेख फारुक, खंडेराव देडे, विशाल सुर्यवंशी, यशवंत पवार, व्यंकटेश नरसिंगे, वैभव बालकुंदे, मारोती काळे, साईनाथ घोणे, ॲड अशिष कुटवाडे, सुजित नाईक, राजेंद्र देबटवार यांच्यासह लातूरमधील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौकट: पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या खासदार पाटील यांचा निषेध.प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपस्थित पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध केला. पत्रकारांना अभद्र भाषेत शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे ही घटना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान करणारी आहे. लोकशाहीत पत्रकारांचा सन्मान झालाच पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी जेष्ठ पत्रकार शशिकांत पाटील यांनी व्यक्त केली.





