डीवायएसपी गजानन भातलवंडे यांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” जाहीर
पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान
लातूर ( माध्यम वृत्तसेवा ) लोह्याचे भूमिपुत्र सध्या उदगीर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उदगीर पोलीस उपअधिक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना राज्यसरकारचे “अतिविशिष्ट सेवा पदक २०२६” जाहीर झाले असून ; पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनी त्यांना गौरविण्यात आले. भातलवंडे यांना यापूर्वी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.लोह्याच्या भूमीपुत्रांच्या सन्मानात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे .

नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे भूमीपूत्र राज्याचे सेवानिवृत कृषी व सहकार आयुक्त कृष्णा लव्हेकर,( आय ए एस ) सेवानिवृत विशेष पोलीस महानिरिक्षक मेहरबान राठोड( आय पी एस ) हे .प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या भूमीचा लौकिक राज्यात वाढविला .सध्या मेहरबान राठोड याचे चिरंजीव छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा पोलीस आयुक्त आहेत. या अधिकाऱ्याच्या पंगतीत लोह्याचे भूमिपूत्र गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांचा समावेश होतो .

पोलीस दलात शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गजानन भातलवंडे यांची अतिशय चांगली कामगिरी आहे. लोह्याच्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे त्याचे शालेय शिक्षण झाले. १९८६ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्याकाळी तालुक्यात ते सर्वप्रथम आले होते. ( तेव्हाचा कंधार) प्रभावी वक्तृत्व असलेले भातलवंडे हे मैफल जमविणारे खास व्यक्तिमत्त्व होय .
बी एस्सी अँग्री पदवीधर असलेले गजानन भातलवंडे पीएसआय म्हणून पोलीस दलात १९९३ मध्ये भंडारा जिल्ह्यात पहिली पोस्टिंग झाली(गोंदिया) परभणी, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली आहे .नांदेड येथे काही काळ पीआरओ होते . सध्या उदगीर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत.त्यांना भंडारा येथे १९९७ मध्ये मध्ये विशिष्ट पोलीस सेवा पदक, त्यानंतर २००९ मध्ये मध्ये आंतरिक सुरक्षा पदक २००२ मध्ये राष्ट्रपती पदक तर यावर्षी म्हणजे २०२६ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. शिवाय अन्य दोन पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते. आज १५ आँगस्ट रोजी त्यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
.लोह्याचे भातलवंडे हे उच्च विद्याविभूषित कुटुंब आहे. ते तिघेही भाऊ परभणी कृषी विद्यापीठातून पदव्युतर झाले आहेत.पांडूरंग भातलवंडे विमा अधिकारी तर मनोज भातलवंडे हे परभणी जिल्हा वेतनपथक अधिक्षक आहेत . माजी मंत्री संजय बनसोडे यांनी भातलवंडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.





