Homeसांस्कृतिकनाथ संस्थान औसा येथे श्रावण मास अनुष्ठानास आरंभ

नाथ संस्थान औसा येथे श्रावण मास अनुष्ठानास आरंभ

सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या वार्षिक श्रावणमास अनुष्ठानास आरंभ

.औसा.दिनांक.12.(ॲड. शाम कुलकर्णी याजकडून ):-.श्री सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या परंपरेतील सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या श्रावणमास अनुष्ठानास गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आरंभ होत आहे.दैनंदिन कार्यक्रम

श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या या श्रावणमास अनुष्ठान श्री नाथ मंदिरात दररोज पहाटे काकडा सकाळी विष्णुसहस्रनाम पाठ नित्य पूजा सद्गुरु समाधींना रुद्राभिषेक स्वयंभू विठ्ठलाला अभिषेक ब्राह्मणांच्या मंत्रघोषात संपन्न होऊन महाआरती होते.सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नियोजन तथा मार्गदर्शनात श्रावण अनुष्ठानातील सर्व पूजा विधि आरती,महाप्रसाद पंगती,भजन, नित्य मंदिरातीलचक्रीभजन पारायण संपन्न होते.दररोज इच्छुक भाविकांनागुरुदीक्षा उपदेश लाभ.

..सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या गुरु गादीचा उपदेश घेणाऱ्या इच्छुक भाविकांना श्रावण महिना गुरु मंत्र दीक्षा घेण्यासाठी खुला असून एकादशी गोकुळाष्टमी वगळता दररोज सकाळी नऊ ते बारा या वेळेत श्री गुरुबाबा महाराज व श्री गहिनीनाथ महाराज हे गुरुपदेश देण्यासाठी उपलब्ध होतात .

नाथमंदिरात दररोज प्रासादिक चक्रीभजनाचा लाभ

…………………………………नाथ संस्थान ची मूळ मुख्य उपासना असणारे चक्रीभजन श्रावण आरंभापासून ते पोळा अमावस्या च्या दुसऱ्या दिवशी श्रावण अनुष्ठानाच्या सांगता सोहळ्यापर्यंत नाथ मंदिरात संपन्न होते सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत ही चक्रीभजनाची सेवा आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी वरील रसाळ निरूपण श्रोत्या भक्तांसाठी पर्वणी ठरते.सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर अथवा त्यांचे द्वितीय चिरंजीव ह भ प ॲड ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर ही चक्रीभजनाची सेवा विठ्ठलाच्या व सद्गुरूंच्या समाधी सन्मुख रुजू करतात.

नाथ मंदिरात दररोज धुपारती सोहळा

नाथ मंदिरातील स्वयंभू विठ्ठलाची धुपारती सायंकाळी सहा वाजता ह भ प श्री श्रीरंग गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते व नियोजनात संपन्न होते यावेळी विठ्ठल भगवंताचा थकवा काढण्याचे पूजा विधी उपचार होतात दररोज विठ्ठलाला वेगवेगळ्या रूपामध्ये नटवले सजवले जाते विठ्ठलाच्या भोवती आकर्षक असे सजावट आणि विद्युत रोषणाईने भक्तीमय वातावरण निर्माण होते. संपूर्ण महिना श्री गुरुबाबा महाराज हे आयाचित् व्रत धारण करून संपूर्ण श्रावण महिना नाथ संस्थानात वास्तव्यास असतात.सकाळची विठ्ठलाची आणि सद्गुरु समाधींच्या महापूजेची संपूर्ण जबाबदारी ह भ प श्री श्रीरंग महाराज आणि ह भ प श्री ज्ञानराज महाराज यांच्याकडे असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments