निलंगा तालुक्यातील तगरखेडा या गावचा सुपूञ राहुल गुणवंतराव पाटील मनोरंजनातील झी युवाचा सुपरस्टार….
आम्ही बेफिकर सिनेमा दि.१२ सप्टेंबर दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ०७ वाजता पुन्हा सादरीकरण पाहाण्यास विसरू नका….
लातूर जिल्ह्याच्या मातीतील उत्कृृष्ट अभिनेता….
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील तगरखेडा गावातील रहिवाशी मरारवाड्याचा एक वेगळा इतिहास आणि एक वेगळी ओळख असणारा नेहमीच या मातीत वेगवेगळ्या कलाकौशल्यांनी गुणांत बहरलेला अनेक रत्ने जन्माला येतात.असाच एक रत्न दि.१२ सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वातील झी युवा या मराठी टी.व्ही.चॅनलवर दुपारी १२ आणि राञी ०७ वाजता आम्ही बेफिकर या फिल्म मध्ये मुख्य भूमिके दिसणार आहे.
लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील रहिवाशी रितेश विलासराव देशमुख यांनी पहिला मान लातूरकरांना हिंदी फिल्म इंडस्ट्री तथा मराठी फिल्म इंडस्ट्रीत त्यांनी उल्लेखनिय अभिनेता म्हणून सन्मान दिला पुठे ते मराठवाड्यातील लातूरचे सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी चिञपट सृृृृष्टीत आपली एक छाप तयार करणारा अभिनेता ठरला आहे.
त्यानंतर मराठवाड्यातील अनेक तरूण या चिञपट सृृष्टीकडे वळत असतानाचं यातील निलंगा तालुक्यातील तगरखेडा यागावातील रहिवाशी राहुल गुणवंत पाटील या युवकाने गेली सहा वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत घेऊन तो मराठवाड्याचे व तग तगरखेडा गावाचे नाव उज्वल केले आहे.आतापर्यंत त्यांनी दहा फिल्म आणि एक म्युझिक अल्बम आणि पंचवीस एक शाॅर्ट फिल्म केल्या आहेत.यापूर्वी त्यांनी सुप्रसिध्द गायक सोनु निगम,आनंद शिंदे यांच्या म्युझिक मध्ये ही सादरीकरणाच्या मुख्य भूमिका केलेल्या आहेत.नुकतेच त्यांचे दोन मराठी अल्बम रिलिज झालेले आहेत.तसेच ते सुपर हिट ठरलेही आहेत.

आपण सर्व प्रेक्षकांनी अशा कर्तृत्वान युवा अभिनेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी झी युवा या मराठी चॅनल वरती दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आणि राञी ०७ वाजता त्यांचा आम्ही बेफिकर हा सिनेमा पाहावा,असे तगरखेडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.











