लातूर ( प्रतिनिधी )पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पत्रकार अहिल्या कसपटे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत लातूर ऑब्स्टेट्रिक गायनोलॉजिस्ट सोसायटी तर्फे ‘नारी शक्ती गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्या कसपटे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिला या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

वैद्यकीय सेवा देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे लातूर ऑब्स्टेट्रिक गायनोलॉजिस्ट सोसायटी चे अध्यक्ष, केजीएन हॉस्पिटलचे डॉ. आमिर शेख, डॉ. विष्णू तारसे, डॉ. विष्णू जाधव यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिलांना सामाजिक कार्यात अग्रेसरपणे काम करण्यास प्रेरित करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत या पुरस्काराचे आयोजन केले होते.
आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी लातूर येथील सयाजी हॉटेल येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षपदी फॉगसीच्या सचिव डॉ. सुवर्णा खाडिलकर यांची उपस्थिती होती तर मोनोपॉस सोसायटी मुंबई च्या अध्यक्ष डॉ. प्रिया ठाकूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अहिल्या कसपटे यांच्यासह महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आशाताई भिसे, पोलिस उप अधीक्षक भागीरथी पवार, ॲड. मोहजबिन काझी, डॉ. अर्चना लड्डा, अंधश्रधा निर्मूलन समितीच्या रुकसाना मुल्ला, डॉ. मीरा चिंचोलकर, डॉ. प्रीती बादाडे यांनाही नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.




