26.3 C
Pune
Monday, August 10, 2026
Home ठळक बातम्या *उसाचा ट्रक कोसळला*

*उसाचा ट्रक कोसळला*

0
462

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा येथील पुलाजवळील मार्गावरून जाणारा उसाचा ट्रक 60 फुटाच्या अंतराने खाली कोसळला...

मार्गावरील रस्त्याचे अर्धवट काम थांबल्याने “त्या” ठिकाणी दिशादर्शक नसल्याचे हा प्रकार घडला..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } निलंगा तालुक्यातील मसलगा येथील भारतातील पहिला पुलाची निर्मिती झाली.पुलाजवळील मार्गावरून उसाचा ट्रक 60 फुटाच्या अंतराने खाली कोसळला आहे.माञ,मसलगा मार्गावरील वाहनधारकांना दिवसा-राञी वाहनधारकांची वर्दळ वाढली असल्याने यामार्गावरील दिशादर्शक फलक नसल्याने त्यांना पुढील मार्ग मार्गस्थ होण्यासाठी मोढा अडथळा निर्माण होत असल्याने याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन दिशादर्शक फलक लावण्याची गरज असल्याची मागणी वाहनधारक करित आहेत.

दरम्यान,यामार्गावरील अंतर ढेऊन कामकाज चालू आहे पण अद्यापही निटूर येथील बसथांबाजवळील दिवे अंधारमय अवस्थेत असल्याने राञी प्रवासवारकांना याचा मोढा ञास सहन करावा लागत आहे.तसेच,मार्गावरील अनेक गावे लागतात त्याठिकाणी दिशादर्शक लावणे अनिवार्य असताना कुढलीही व्यवस्था नसल्याने प्रवाशीधारक आणि वाहनधारकास याचा मोढा ञास सहन करावा लागत आहे.तरी,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } मार्गावरील इस्टिनेट प्रमाणे कामे करावीत,अशी मागणी सर्वसामान्यांची आहे.


एकंदर,राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा येथील भारतातील पहिला पुल उच्च तंञज्ञानाच्या मलेशियन डयुरा सिस्टिमच्या तंञज्ञानाने बनविला असल्याने याठिकाणची देखभाल चोख ढेवणे गरजेचे आहे.तसेच,याठिकाणच्या मार्गावरील प्रवाशीधारक आणि वाहनधारकाला दिशादर्शक नसल्याने त्यांना मार्गस्थ होण्यासाठी मोढा अडथळा निर्माण झाला आहे तरी तात्काळ दिशादर्शक बसविणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थ करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]