स्वच्छता.. पर्यावरणसाठी कटिबद्ध व्हा

0
237

*स्वच्छता, देशसेवा, शिस्त, पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहावे – महाऊर्जा व्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांचे प्रतिपादन*  

लातूर दि.. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय, भारत सरकार) आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संरक्षण से स्वच्छता’ या विषयावरती वेबिनार चे आयोजन करण्यात आले. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये सामाजिक आणि व्यतिगत स्वच्छता याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन महाऊर्जा विभागीय कार्यालय लातूर चे महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी, पीसीआरए पुणे संयुक्त निदेशिका स्वाती कुमारी, दयानंद विज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेळ्ळाले तसेच महाविद्यालयाचे कमिटी पदाधिकारी, विद्यार्थीं, पालक यांनी ऑनलाईन लाईव्ह व्हर्च्युअल वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुधारित उर्जा कार्यक्षमता आणि उर्जेचे कार्यक्षम व्यवस्थापन पर्यावरणाचे नुकसान आणि आर्थिक बचती साठी उपयुक्त असल्याचे मनोगत महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी व्यक्त केले. स्वच्छता, देशसेवा, शिस्त, पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन उपस्थितांना कुलकर्णी यांनी केले. वाढत्या कार्बन फूटप्रिंटच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांवर ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारा ‘हरित आणि स्वच्छ ऊर्जा’ विषयावरती मार्गदर्शन केले. पीसीआरए यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर १- १५ जुलै २०२१ दरम्यान ‘स्वच्छता पंधरवाडा’ राबविण्यात येत आहे. ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यक्रमात यूट्यूब व झूम प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळ्या ठिकाणांहून ४५० विद्यार्थीं विद्यार्थिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यपिका लोखंडे यांनी केले तर आभार प्राध्यापिका डॉ. मनीषा गुरमे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप ‘राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान’ प्रतिज्ञेने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here