झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित
चंद्रपूर ( प्रतिनिधी)
झाडीबोली साहित्य मंडळ शाखा जुनासुर्ला(ता.मुल ) द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यकृतीची यादी घोषित करण्यात आलेली आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहित्य सेवा पुरस्कार श्री भारत सातपुते(लातुर) यांना ; झाडीपट्टी ची बहिणाबाई सौ.अंजनाबाई खूणे काव्य पुरस्कार श्री. संदीप धावडे, वर्धा यांच्या परिवलन - परिभ्रमण या ग्रंथास;
डॉ. राजन जयस्वाल समीक्षण पुरस्कार डॉ.राजेंद्र राऊत अमरावती यांच्या लिळाचरित्रातील कथारूपे या ग्रंथास ; एड.लखनसिंह कटरे भाषा संशोधन पुरस्कार डॉ.सुरेश देशमुख अमरावती यांच्या (भोयरी मराठी शब्द कोष आणि भाषा विज्ञान या ग्रंथास ; डॉ. हेमकृष्ण कापगते वैचारिक लेखन पुरस्कार श्री. मधुकर कोटनाके राजुरा यांच्या कोलामगुड्याची शिक्षण यात्रा या ग्रंथास; हिरामण लांजे बालकथा पुरस्कार कु. तनिष्का डांगे पुसद यांच्या जादूची झप्पी या पुस्तकास , द. सा. बोरकर स्मृति कथा पुरस्कार डॉ. अनंता सूर ,मुकूटबन यांच्या भोगवाटा या ग्रंथास ; डॉ. घनश्याम डोंगरे स्मृति कादंबरी पुरस्कार श्री. रसुल सोलापूरे, कोल्हापूर यांच्या फाटलेलं आभाळ या ग्रंथास;
विठ्ठल लांजेवार स्मृति बालकाव्य पुरस्कार एकनाथ आव्हाड मुंबई यांच्या शब्दांची नवलाई या ग्रंथास; वा.चं. ठाकरे स्मृति संकीर्ण ग्रंथ पुरस्कार श्री. सुरेंद्र बुराडे- नागपूर यांच्या केल्याने देशाटन या ग्रंथास;बापुराव टोंगे स्मृती आत्मकथन पुरस्कार श्री.यवनाश्व गेडकर, चंद्रपूर यांच्या आणि असा मी घडत गेलो या ग्रंथास जाहीर करण्यात आले आहे. सदर साहित्य पुरस्कार वितरण झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला ता. मुल येथे दि. १२ मार्च शनिवार रोजी मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. विशेष पुरस्कार म्हणून झाडीपट्टी कलायात्री पुरस्कार – श्री. हिरालाल पेंटर यांना,झाडीपट्टी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार – गौरव मर्लेवार यांना,झाडीबोली ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार- श्री. सुधाकर मारगोनवार आष्टी यांना, झाडी बोली उत्कृष्ट ग्राफिक्सकार पुरस्कार- रामकृष्ण चनकापुरे घाटकुळ यांना, झाडीबोली युवा कार्यकर्ता पुरस्कार श्री.कुंजीराम गोंधळे,मुर्झा यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी राज्यभरातून १४७ गंथ आले होते. त्यातून उत्तम साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे. निवड समिती चे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळांचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, जुनासुरला शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण खोबरागडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोबरागडे ,सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम आदींनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.