27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeशैक्षणिकस्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र लातूरात करावे -मागणी

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र लातूरात करावे -मागणी

यु.पी.एस.सी च्या धर्तीवर लातूर येथे एम पी एस सी पुर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करणे बाबत सामाजिक न्याय मंत्री धनजय मुंढे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मागणी

लातूर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विभागा अंतर्गत स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी) मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा)पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र नागपूर व औरंगाबाद येथे सुरू करण्यात आली आहेत
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना राज्याच्या नागरी सेवेत जास्तीत जास्त प्रमाणात संधी उपलब्ध व्हावी या उद्धेशाने केंद्रे सुरू केली आहेत या प्रशिक्षण केंद्रातून ६०विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी राहणार असुन यात विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश व तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा सोबतच ९,०००/-रुपये स्टायफंड व १५,०००/-रुपये साहित्य खरेदीसाठी देण्यात येणार आहे.


एस सी, एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी प्रमाणे लातूर येथे एम पी एस सी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यास लातूर जिल्हयातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी, राहण्याची सेवा सुविधा आदींमुळे जे इतर जिल्हयात किंवा मोठ्या शहरात न जाता आल्यामुळे स्पर्धा परिक्षेपासून वंचित राहत होते अश्या विद्यार्थ्यांना फार मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र लातूर येथे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीने राज्याचेसामाजिक न्यायमंत्री नाधंनजय मुंढे, राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांना शिष्ट मंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ नेते अँड व्यकटराव बेंद्रे, अँड किरण बडे, संजय काथवटे, नवनाथ आल्टे, राहुल कांबळे उपस्थित होते निवेदनाची एकप्रत
श्री डी आर गजभिये,
महासंचालक,
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना पाठविण्यात आली आहे निवेदनावर मुख्य संयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, किरण कांबळे, भीमराव दुंनगावे, अँड सुहास बेद्रे, महेश बिजापूरे, डॉ अंबादास कारेपुरकर, लाला सुरवसे, प्रा जितेंद्र बनसोडे , दिनेश लोखंडे, प्रतिक काथवटे, आनंद पारसेवार, दिगबर कांबळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]